कंधारमध्ये तालिबानच्या 90 दहशतवाद्यांचा खात्मा, अफगाणिस्तान सरकारचा दावा
अफगाणिस्तानमधील (Afghanistan) कंधारच्या दक्षिण भागात अफगान राष्ट्रीय सुरक्षा दल आणि तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाली आहे.
काबूल : अफगाणिस्तानमधील (Afghanistan) कंधारच्या दक्षिण भागात अफगान राष्ट्रीय सुरक्षा दल आणि तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाली आहे. यात तब्बल 90 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा अफगाणिस्तान सरकारने केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितलं की या चकमकीत 90 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि 9 आणखी दहशतवादी जखमी झाली आहेत. अफगाणिस्तानच्या सैन्याने कंधारच्या पंजवाई, झरी, अरघनदाब आणि मायवंद जिल्ह्यातील तालिबानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत कारवाई केली. यात अनेक दहशतवादी मारले गेले (Afghan Army claim killing of 90 Talibani terrorists in Kandhar).
अफगानिस्तानच्या संरक्षण संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “अफगाण सैन्याने या कारवाईत 15 अँटी व्हेईकल माईन्स शोधून निकामी केली आहेत. याशिवाय तालिबानी दहशतवाद्यांच्या हत्यारांचा साठाही उद्ध्वस्त केला. या हत्यारांचा उपयोग करुनच तालिबानकडून अनेक दहशतवादी मोहिमा केल्या जात होत्या. विशेष म्हणजे अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान दरम्यान कतरच्या दोहामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरु असताना अफगाण संरक्षण मंत्रालयाने हा दावा केलाय.
विशेष म्हणजे अफगाणिस्तान सरकारने माध्यमांना दिलेल्या माहितीनंतर तालिबानने याला प्रत्युत्तर देत कंधारमध्ये अशी कोणतीही चकमक झाली नसल्याचा दावा केलाय. तालिबानला कोणतंही नुकसान झालेलं नाही. अफगाणिस्तान सरकारने मारले गेल्याचा जो आकडा सांगितला आहे तो खोटा आहे. सरकारने आपल्या निराश सैन्याला खोटं आश्वासन देण्यासाठी ही माहिती दिली आहे. हा सरकारच्या प्रचारतंत्राचा भाग आहे.”
संबंधित बातम्या :
अफगाणिस्तानमध्ये मशिदीत भीषण स्फोट, 62 जणांचा मृत्यू
तालिबानकडून 11 दहशतवाद्यांच्या बदल्यात तीन भारतीय इंजिनिअर्सची सुटका
भारत आणि तालिबान पहिल्यांदाच आमने सामने
Afghan Army claim killing of 90 Talibani terrorists in Kandhar