Afghanistan Blast : अफगाणिस्तान पुन्हा स्फोटांनी हादरलं, 9 मृत्युमुखी तर 13 जखमी

बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ भागात हा स्फोट झाला. त्याचवेळी, टोलो न्यूजनुसार, दोन्ही स्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला टार्गेट करण्यात आले. स्फोटानंतर परिसरात पुन्हा मोठी दहशत माजली आहे.

Afghanistan Blast : अफगाणिस्तान पुन्हा स्फोटांनी हादरलं, 9 मृत्युमुखी तर 13 जखमी
अफगाणिस्तानात पुन्हा मोठा स्फोटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 11:40 PM

अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी (Afghanistan Blast) हादरला आहे. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 9 जण ठार तर 13 जण (Bomb Blast) जखमी झाले आहेत. स्थानिक मीडियाने (Afghanistan Media) सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ भागात हा स्फोट झाला. त्याचवेळी, टोलो न्यूजनुसार, दोन्ही स्फोटांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला टार्गेट करण्यात आले. स्फोटानंतर परिसरात पुन्हा मोठी दहशत माजली आहे. त्यांच्या आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या स्फोटांची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी घडला होता, गेल्या गुरुवारी मजार-ए-शरीफ येथे झालेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. इस्लामिक स्टेटने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

सिरियल ब्लास्टचा धमाका

अफगाणिस्तानमध्ये 21 एप्रिल रोजी सिलियल ब्लास्ट झाले, ज्यात किमान 10 लोक जागीच मरण पावले आणि 40 हून अधिक जखमी झाले. मात्र, नंतर मृतांचा आकडा 30 च्या पुढे गेला. रमजानच्या या पवित्र महिन्यात उत्तर मजार-ए-शरीफ येथील साई डोकान मशिदीत नमाज पढत असताना हा स्फोट झाला. त्याचवेळी राजधानी काबूलमध्ये आज सकाळी रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुलं जखमी झाली. त्या बॉम्बद्वारे देशातील अल्पसंख्याक शिया समुदायाला लक्ष्य करण्यात आले. काबूलमधील दश्त-ए-बरची भागात स्फोटाची ही घटना घडली.

तिसरा स्फोट उत्तर कुंदुझ प्रांतात

दोन दिवसांपूर्वी याच भागात शैक्षणिक संस्थांना टार्गेट करून अनेक स्फोट घडवून आणण्यात आले होते, ज्यात किमान 6 मुलांचा मृत्यू झाला होता. तर 17 जण जखमी झाले. तिसरा स्फोट उत्तर कुंदुझ प्रांतात झाला. प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख मतिउल्ला रुहानी यांनी सांगितले की, स्फोटात मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाला टार्गेट करण्यात आले. काही महिन्यांच्या तुलनेने शांततेनंतर पुन्हा स्फोटांची मालिका सुरू झाली.

संयुक्त राष्ट्र म्हणतात ‘भयानक’

संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्याला भीषण हल्ले म्हटले आहे. अफगाणिस्तानचे डेप्युटी स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह रमिझ अल्काबरोव्ह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, या हत्या आता थांबल्या पाहिजेत आणि यात मरण पावलेल्यांना न्याय मिळायला हवा. इस्लामिक स्टेट अर्थात IS ही संघटना गेल्या ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून तालिबान राजवटीसमोर आव्हान म्हणून उभी राहिली आहे, आता तालिबान हे आव्हान मोडून काढणार की अशीच डोकेदुखी वाढत राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.