Kabul Airport Attack: काबुल विमानतळावर 24-36 तासात आणखी एक हल्ल्याची शक्यता, अमेरिकेच्या अध्यक्षांचा इशारा
अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः शनिवारी (28 ऑगस्ट) याबाबत इशारा दिला. हा हल्ला पुढील 24-36 तासात होण्याची शक्यता आहे.
काबुल : अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः शनिवारी (28 ऑगस्ट) याबाबत इशारा दिला. हा हल्ला पुढील 24-36 तासात होण्याची शक्यता आहे. जमिनीवरील परिस्थिती धोकादायक तयार झालीय. विमानतळावर दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढलाय. पुढील काही काळात हे हल्ले होण्याची शक्यता असल्याची माहिती सैन्याच्या कमांडरांनी दिलीय, असंही बायडन यांनी नमूद केलंय.
काबुलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर गुरुवारी (26 ऑगस्ट) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एक सुसाईड बॉम्बर आणि आयएसआयएस-केचे अनेक दहशतवाद्यांनी 13 अमेरिकन सैनिक आणि 169 अफगाण नागरिकांची हत्या केली. आता पुन्हा हल्ल्याची शक्यता असल्यानं अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. बायडन यांनी देखील वॉशिंग्टनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा टीम आणि काबुलमधील सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केलीय.
I said we would go after the group responsible for the attack on our troops and innocent civilians in Kabul, and we have. My full statement on the strike that U.S. forces took last night against the terrorist group ISIS-K in Afghanistan: https://t.co/hOb6xQ4ZZv
— President Biden (@POTUS) August 28, 2021
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात आयसिसच्या दोन सदस्यांचा खात्मा, तर एक जण जखमी
बायडन म्हणाले, “अमेरिकेने हल्ल्याला चोख उत्तर देत अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट आयसिस-के विरोधात एअर स्ट्राईक केलं. हा हल्ला शेवटचा नाहीये. हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना याची किंमत चुकवावी लागेल. जेव्हा केव्हा कुणी अमेरिकेला नुकसान पोहचवतं किंवा आमच्या सैन्यावर हल्ला करतं तेव्हा आम्ही उत्तर देऊ यात काहीच शंका नाही.” अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्यात आयसिसचे दोन दहशतवादी मारले गेलेत आणि एक जण जखमी झाल्याचंही सांगितलं जातंय.
‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान
जो बायडन म्हणाले होते, “आम्ही अफगाणिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना वाचवू. आमचं मिशन सुरू असून अफगाणच्या सहकाऱ्यांना आम्ही बाहेर काढू. काबुल विमानतळाबाहेरील हल्ल्यात मारले गेलेले अमेरिकन सैनिक हिरो होते. ते इतरांना वाचवण्यासाठी एक धोकादायक आणि निस्वार्थी मोहिमत सहभागी होते. अजूनही कमीत कमी 1,000 अमेरिकन नागरिक आणि इतर अनेक लोक काबुलमधून निघण्यासाठी संघर्ष करत आहेत.”
‘आता जागाही आमचीच आणि वेळही, तिथंच प्रत्युत्तर देणार’
“अमेरिकेला हे माहिती आहे की या हल्ल्याचा आदेश देणारा आयसिसचा नेता कोण होता? तो कोठेही असेल, तरी त्याला कोणतंही मोठं मिलिट्री ऑपरेशन न करता आम्ही पकडू. मिलिट्री कमांडर्सला ISIS-K वर स्ट्राईक करण्याचा प्लॅ करण्यास सांगण्यात आलंय. आता जागाही आम्ही निवडलेली असेल आणि वेळही, तिथेच हल्लेखोरांना उत्तर देऊ,” असं मत बायडन यांनी व्यक्त केलं होतं.
हेही वाचा :
अमेरिकानं काबुल हल्ल्याचा बदला घेतला, ठरलेल्या वेळ-ठिकाणावर ISIS-K च्या दहशतवाद्यावर एअर स्ट्राईक
काबुल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने बचाव मोहीम थांबवली
Kabul Airport Attack: ‘बदला घेणार, हल्ल्याचं ठिकाण आणि वेळ आमचंच असणार’, जो बायडन यांचं आयसीसला आव्हान
व्हिडीओ पाहा :
American president Joe Biden say possibility of more terrorist attack on Kabul Airport in next 36 hours