AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहकाची दाढी कापली, ट्रीम केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, तालिबान्यांचा सलून चालकांना फतवा

हेलमंद प्रांतातील सलूनवर तालिबान्यांनी क्लिन शेव करण्यावर किंवा दाढी ट्रीम (trim the beard) करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याबाबत तालिबानी प्रत्येक सलून चालकाला जाऊन धमकावतही आहेत.

ग्राहकाची दाढी कापली, ट्रीम केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, तालिबान्यांचा सलून चालकांना फतवा
दाढी करणं हे इस्लामी कायद्याविरोधात असल्याचं तालिबान्यांचं म्हणणं आहे.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 1:48 PM

अफगाणिस्तानात तालिबान (Afghanistan Taliban) हळू-हळू आपली पायामूळं मजबूत करत आहे आणि आपले कायदे लागू करत आहे. आता तालिबानच्या (Taliban) निशाण्यावर आहेत सलून चालक. कारण, सलून चालकांना (salon professionals)तालिबान्यांनी कट्टर आदेश आणि धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील अनेक ब्युटी पालर्सच्या बाहेरचे मुलींचे फोटो तालिबान्यांनी फाडले आहे, हे ब्युटी पार्लरही बंद झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आता सलून चालकांना आपल्या निशाण्यावर घेतलं आहे. हेलमंद प्रांतातील सलूनवर तालिबान्यांनी क्लिन शेव करण्यावर किंवा दाढी ट्रीम (trim the beard) करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याबाबत तालिबानी प्रत्येक सलून चालकाला जाऊन धमकावतही आहेत. ( The customer does not want to cut or trim the beard.Taliban threaten salon professionals in Afghanistan )

फ्रंडीटर पोस्टने याबाबत रिपोर्ट दिली आहे. रिपोर्टनुसार, तालिबान्यांनी सलून चालकांना दाढी ट्रीम करण्यावर वा दाढी कापण्यावर बंदी घातली आहे. दाढी करणं हे इस्लामी कायद्याविरोधात असल्याचं तालिबान्यांचं म्हणणं आहे. शिवाय, या आदेशाचं जे सलूनचालक पालन करणार नाही, त्यांना त्यांची कडक शिक्षा भोगावी लागेल अशीही धमकी देण्यात आली आहे. याबाबत इस्लामिक ओरिएंटेशन मंत्रालयाने सलून चालकांची एक बैठकही घेतल्याची माहिती आहे.

सलूनमध्ये गाणी वाजवण्यावरही बंदी

दरम्यान, सलून चालकांच्या याच बैठकीत, सलूनमध्ये गाणी वाजवू नये असाही आदेश तालिबान्यांनी दिला आहे. एवढ्यावरच तालिबानी थांबले नाहीत तर त्यांनी हा आदेश थेट सोशल मीडियावरही पोस्ट केला आहे. सलूनमध्ये कुठल्याही प्रकारचं संगीत वा गाणी वाजवू नये अशा प्रकारचा हा आदेश आहे.

हेलमंद प्रांतातील सलूनबाहेर अशाप्रकारच्या आदेशाचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. ज्यात सलूनचे मालक आणि कर्मचाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. शरीया कायद्याचं पालन करण्याचं या पोस्टर्समध्ये सांगण्यात आलं आहे. हेच नाही तर कुणीही ही चूक करु नये, यासाठी तालिबानचे दहशतवादी प्रत्येक सलूनची झडती घेत आहेत आणि सलून चालकांना धमकावत आहेत. केस कापण्यावरही तालिबान्यांनी काही बंधनं घातली आहे, केस कापताना ते साध्या पद्धतीनेच कापावे, कुठल्याही विदेशी पद्धतीच्या हेअर स्टाईल्स चालणार नाही असं या पोस्टर्सवर लिहण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानातील सलून व्यवसाय ठप्प होणार

अफगाणिस्तानातील सलून व्यवसाय पुन्हा ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. 1996 ते 2001 या तालिबानच्या शासनकाळात सर्वाधिक हाल हे सलून चालकांचेच झाले आहे. त्या काळात कुणीही सलूनमध्ये जाण्यासाठी घाबरत होतं. शिवाय, सलून चालकांवरही अत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे हजारो सलून बंद झाले होते. मात्र, अमेरिकेने जेव्हा तालिबानला अफगाणिस्तानातून पळवून लावलं, तेव्हा सलून चालकांसाठी सुगीचे दिवस सुरु झाले. अफगाणिस्तानात विदेशी पद्धतीचे ब्युटी पार्लरही उघडले, मात्र आता तालिबानचं पुन्हा राज्य आल्यानंतर सलून व्यवसाय ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

Zakir Naik : झाकीर नाईक मुलासाठी मुलगी शोधतोय, फेसबुक पोस्टद्वारे सांगितल्या अटी

PHOTO: अमेरिकेत पंतप्रधान मोदींना मिळाला मौल्यवान नजराणा, दुर्मिळ वस्तूंचा खजिना घेऊन मायदेशी परतणार

 

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.