America Air Strike | अमेरिकेची बदल्याची कारवाई, एकाचवेळी 85 ठिकाणांवर मोठा हल्ला, इराणला दणका

America Air Strike | अमेरिकेने इराणला दणका दिला आहे. अमेरिकेने त्यांच्या तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अमेरिकेने अशी कारवाई करणार हे आधीच सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी ही Action घेतली आहे. मागच्या आठवड्यात सीरीयाच्या सीमेजवळ जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या सैन्य तळावर ड्रोन हल्ला झाला होता. अलीकडच्या काही वर्षातील अमेरिकेवरील हा मोठा हल्ला होता.

America Air Strike | अमेरिकेची बदल्याची कारवाई, एकाचवेळी 85 ठिकाणांवर मोठा हल्ला, इराणला दणका
America Air Strike
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 8:18 AM

America Air Strike | अमेरिकेने आपल्या तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रत्युत्तराची कारवाई करणार असं सांगितलं होतं. त्यानुसार, अमेरिकेने Action घेतली आहे. अमेरिकेने इराक आणि सीरियामधील तळावर हल्ले केले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड (IRGC) आणि त्यांच समर्थन असलेल्या मिलिशिया ग्रुपशी संबंधित 85 पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिक सैन्याने खास करुन इराणच्या कुद्स फोर्सला टार्गेट केलं. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने इराणी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला.

जॉर्डनमध्ये अमेरिकन सैन्य तळावर ड्रोन हल्ला झाला होता. यामध्ये तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेने इराक आणि सीरियमधील इराणची कुद्स फोर्स आणि त्यांचे तळ नष्ट करण्याच ठरवलं. सैन्य ऑपरेशन सुरु करणार असल्याच अमेरिकेने आधीच सांगितलं होतं. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी परवानगी सुद्धा दिली होती.ट

एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर जो बायडेन काय म्हणाले?

शुक्रवारी अमेरिकन सैन्याने जॉर्डन तळावरील हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत, असं सीरियाच्या मीडियाने म्हटलं आहे. त्यांनी नेमका आकडा सांगितलेला नाही. अमेरिकेने 85 ठिकाणांवर स्ट्राइक केलाय. तुम्ही कुठल्याही अमेरिकन नागरिकाच नुकसान केलं, तर आम्ही उत्तर देणार असं इराक आणि सीरियामधील स्ट्राइकनंतक जो बायडेन यांनी म्हटलं आहे.

‘….तर आम्ही उत्तर देणार’

आमच्याकडून कारवाई सुरु झालीय. ती यापुढेही सुरु राहिलं, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलय. “अमेरिकेला मध्य पूर्वच नाही, जगात कुठेही संघर्ष नकोय, पण तुम्ही आमच नुकसान केलं, तर आम्ही उत्तर देणार” असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने ठरवलय की….

मागच्या रविवारी सीरियाच्या सीमेजवळ जॉर्डनमध्ये अमेरिकन सैन्य तळावर ड्रोन हल्ला झाला. यात तीन सैनिक मारले गेले, 40 जण जखमी झाले. अलीकडच्या काही वर्षातील अमेरिकन सैन्यावरील हा मोठा हल्ला आहे. अमेरिकेने या हल्ल्यासाठी इराणच समर्थन असलेल्या मिलिशिया ग्रुपला जबाबदार धरलं होतं. अमेरिकेने सीरिया आणि इराकमधील इराणी तळ समूळ नष्ट करायच ठरवलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.