Maldives vs India | चीन नंतर भारताच्या आणखी एका शत्रूबरोबर मालदीवची हातमिळवणी

Maldives vs India | मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याकडून सातत्याने भारताला चीड येईल असं वर्तन सुरु आहे. भारताला डिवचण्याचा प्रयत्न ते करत आहेत. चीन नंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या आणखी एका शत्रूबरोबर हातमिळवणी केली आहे.

Maldives vs India | चीन नंतर भारताच्या आणखी एका शत्रूबरोबर मालदीवची हातमिळवणी
Muizzu And Kakar
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 1:06 PM

Maldives vs India | मालदीवचे विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे भारतविरोधी आहेतच. पण सातत्याने ते आपल्या कृतीमधून भारताला डिवचण्याच काम करत आहेत. भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला. त्यानंतर भारतात बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला. हा सर्व वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले. तिथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर वेगवेगळे करार केला. त्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला चीड आणणार वक्तव्य केलं. त्यांनी मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक भारत विरोधी प्रचारावरच जिंकली. तेच मोहम्मद मुइज्जू आता उघडपणे भारतविरोधी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या भूमिकांना मालदीवमधल्या अन्य राजकीय नेत्यांचा विरोध आहे. मात्र, तरीही त्यांनी भारताच्या विरोधात जाणारा स्टँड घेतला आहे.

मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीनच्या जवळ जात असतानाच आता त्यांनी पाकिस्तानला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचे पाकिस्तान बरोबर कसे संबंध आहेत? हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. पाकिस्तानची स्वत:ची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना आता पाकिस्तान मालदीवच्या विकासात मदत करणार आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्याच त्यांनी ठरवलय.

ही साधीसुधी गोष्ट नाहीय

पाकिस्तानने मालदीवला विकासात मदत करण्याच आश्वासन दिलय. मुइज्जू सरकारने तात्काळ विकास योजनांवर पाकिस्तानकडून समर्थन मागितलय. भारत आणि मालदीवमधील संबंध ताणलेले असताना मालदीव-पाकिस्तानाच जवळ येण ही साधीसुधी गोष्ट नाहीय. भारताबरोबर वाद झाल्यानंतर मालदीवने चीन बरोबर संबंध सुधारले. आता ते पाकिस्तानच्या जवळ जात आहेत. पाकिस्तान आणि मालदीवमध्ये 26 जुलै 1966 रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोन्ही देशांचे चीन बरोबर चांगले संबंध आहेत. पाकिस्तान चीनचा जवळचा सहकारी आहे. मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू बिजींग समर्थक आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.