एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडींग, सर्व प्रवासी सुरक्षित

एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'अबू धाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटच्या इंजिनला आग लागल्यानंतर त्याची सेफ लँडींग झाली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडींग, सर्व प्रवासी सुरक्षित
AIRINDIA EXPRESSImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 10:43 AM

दुबई : अबूधाबीवरून कालीकतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची अबुधाबी विमानतळावर इमर्जन्सी लँडीग करावी लागल्याची घटना घडली आहे. या विमानाच्या पायलटला विमान हजार फूटावर असताना एका इंजिनातून आगीच्या ठीणग्या येत असल्याचे दिसले आणि या विमानाला पुन्हा माघारी आणण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला, त्यामुळे विमानातील 184 प्रवाशांचे प्राण बचावले आहेत.

दुबईच्या अबूधाबी विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने उड्डाण घेताच ही घटना घडली. विमान हजार फूटाच्या उंचीवर असतानाच डाव्या इंजिनाला आग लागल्याचे पायलटला दिसले. त्यानंतर पायलटने आपात्कालिन यंत्रणा सूरु केली. आणि तातडीने विमान उतरविण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अबुधाबी-कालिकत फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनला आग लागल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाचे अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘अबू धाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1 इंजिनला आग लागल्यानंतर परत आले, विमानाने अबू धाबी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘ एअर इंडिया एक्स्प्रेस ऑपरेटिंग फ्लाइट B737-800 VT-AYC IX348 (अबू धाबी-कालिकत) 1000 फूट उंचीवर भरारी घेत असतानाच क्रमांक 1 इंजिनमध्ये आग लागली. यामुळे विमानाला अबुधाबी विमानतळावर माघारी नेत त्याची सेफ लँडींग करावी लागली, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....