Johnson & Johnson Vaccine : भारतात येण्याआधीच अमेरिकेकडून ‘या’ कोरोना लसीवर बंदी, कारण काय?
कोरोना लसी उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधातील लढाईला मोठी ताकद मिळालीय. त्यातच आता जगभरात काही कोरोना लसींबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.
वॉशिंग्टन : जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गानं जगाची चिंता वाढवलीय. मात्र, कोरोना लसी उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधातील लढाईला मोठी ताकद मिळालीय. त्यातच आता जगभरात काही कोरोना लसींबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. आधी एस्ट्राजेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्लॉट) तयार होत असल्याची काही प्रकरणं समोर आली. आता जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson Vaccine) लसीबाबतही काही दुष्परिणाम समोर आल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच अमेरिकेने जॉन्सन अँड जॉन्सन लसीकरणावर तात्पुरती बंदी घातलीय (America ban Johnson & Johnson corona vaccine due to some side effect).
अमेरिकेच्या औषध विभागाने (US FDA) याबाबत अधिकृत भूमिका मांडलीय. अमेरिकेने म्हटलंय, “आम्ही सावधगिरी म्हणून सध्या जॉन्सन अँड जॉन्सन लसीवर काही काळासाठी बंदी घालतो आहे. अमेरिकेत ही लस घेतल्यानंतर ब्लड क्लॉट तयार झाल्याची 6 प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे प्रशासन या प्रकरणांची चौकशी करत आहे. ब्लड क्लॉटची प्रकरणं खूप दुर्मिळ आहेत. कोरोना लसीनंतर असे दुष्परिणाम दिसणं दुर्मिळ आहे. युरोपियन मेडिसिन्स एजन्सी देखील या लसीचा तपास करत आहे.”
Today FDA and @CDCgov issued a statement regarding the Johnson & Johnson #COVID19 vaccine. We are recommending a pause in the use of this vaccine out of an abundance of caution.
— U.S. FDA (@US_FDA) April 13, 2021
लसीची सखोल तपासणी होऊपर्यंत लसीकरण बंद
अमेरिकेच्या FDA संस्थेने म्हटलं, “या ब्लड क्लॉटचा उपचार सामान्यपणे वेगळा आहे. बुधवारी (13 एप्रिल) CDC अॅडव्हायजरी कमेटी ऑफ इम्युनायझेशन प्रॅक्टिसची (ACIP) बैठक होणार आहे. या बैठकीत आतापर्यंत सापडलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच त्यावरील उपाययोजनांची रणनीती ठरवली जाणार आहे. एफडीए रक्ताच्या गुठळ्या झालेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करणार आहे. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या लसीच्या वापरावर बंदी असणार आहे (Johnson and Johnson Vaccine).
हेही वाचा :
भारत सरकार ज्या रशियन लसीच्या वापराला मंजुरी देणार आहे ती नेमकी कशी काम करते? वाचा सविस्तर
Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात
कोरोना वॅक्सिन घेण्याआधी-घेतल्यानंतर काय खावे आणि काय नाही? वाचा…
व्हिडीओ पाहा :
America ban Johnson & Johnson corona vaccine due to some side effect