अमेरिकेतील रुग्णालयात अंदाधुंद गोळीबार! हल्ला करणाऱ्यासह एकूण 5 ठार, कित्येक जखमी

America Firing : स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मिनिटांच्या आतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत गोळीबार झाल्याचं ऐकून लगेचच दुसऱ्या मजल्याकडे धाव घेतली.

अमेरिकेतील रुग्णालयात अंदाधुंद गोळीबार! हल्ला करणाऱ्यासह एकूण 5 ठार, कित्येक जखमी
अमेरिकेत गोळीबारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 10:29 AM

अमेरिका : अमेरिकेत (America Firing) पुन्हा एकदा गनकल्चरने चौघांचा जीव घेतलाय. बुधवारी अमेरिकेच्या (America News) ओक्लाहोमा राज्यात गोळीबाराची (Firing in Hospital) घटना घडली. यात चौघे ठार झाले. टुल्सा शहरातील सेंट फ्रान्सिंस रुग्णालयात गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारा चौघांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झालेत. जखमीवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. गोळीबार करणाऱ्या इसमासह एकूण पाच जण या घटनेत ठार झाल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोळीबार करणाऱ्या इसमाने पिस्तुल आणि रायफल या दोन्हीचा वापर केला होता. गोळीबाराच्या या घटनेनंतर सेंट फ्रान्सिंस रुग्णालयाच्या ज्या इमारतीत गोळीबार करण्यात आला, ती इमारत बंद करण्यात आली.

3 मिनिटांत पोलीस पोहोचले! पण त्याआधी….

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मिनिटांच्या आतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत गोळीबार झाल्याचं ऐकून लगेचच दुसऱ्या मजल्याकडे धाव घेतली. सध्या या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेची माहिती राष्ट्रवादी जो बायडन यांना देण्यात आली आहे. जखमींवर तातडीने उपचार केले जावेत, यासाठी स्थानिक यंत्रणांना मदत करण्याचे निर्देश जारी केले गेलेत. दरम्यान, हल्ला करणारा इसम कोण होता, त्यानं हल्ला का केला, या बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ

अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीय. मंगळवारीही न्यू ऑरलियन्समध्ये गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. याआधी टेक्सास राज्यात झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक ठार झाले होते.

2021 मध्ये अमेरिकेत 693 वेळा गोळीबाराच्या घटना समोर आल्या. तर 2022 मध्ये पहिल्या पाच महिन्यातच 212 गोळीबाराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.