जगात आणखी एका मुस्लिम देशाची भर पडणार? चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

डोनाल्ड ट्रम्प चीनला रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे जगात आणखी एक मुस्लिम राष्ट्र उदयास येऊ शकते.

जगात आणखी एका मुस्लिम देशाची भर पडणार? चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा मास्टर प्लॅन, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 6:47 PM

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमालियापासून वेगळ्या झालेल्या सोमालीलँडला मान्यता देऊ शकतात. 1991 साली आफ्रिका खंडात असलेल्या सोमालियात गृहयुद्ध सुरू झाले होते. त्यावेळी सोमालिया सरकारला विरोध करणाऱ्या एका गटानं अदानच्या आखातासह देशाचा उत्तरी भाग सुरक्षित केला आणि त्याला सोमालीलँड असं नाव देऊन एका स्वतंत्र देशाची स्थापना केली. मात्र या देशाला अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाहीये. या देशात रहाणारे नागरिक आपला कारभार स्वतंत्रपणे चालवतात, मात्र अजूनही जगानं या देशाचं स्वतंत्र अस्थित्व मान्य केलेलं नाहीये. मात्र सोमालीलँडचं राजकीय आणि भौगोलिक महत्त्व ओळखून अनके देशांनी गेल्या काही वर्षांपासून या देशासोबत जवळीक वाढवली आहे.यामध्ये इथोपिया आणि संयुक्त अरब अमीरात युएई यासारख्या देशांचा समावेश आहे.

सेमाफोरने दिलेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिका आता सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होताच घडामोडींना वेग आला आहे.मात्र जर अमेरिकेनं सोमालीलँडला एक वेगळा देश म्हणून मान्यता मिळाली तर अमेरिका आणि आफ्रिकन खंडातील देशांचे संबंध अधिक गुंतागुतींचे बनू शकतात असं देखील बोललं जात आहे. याबाबत हडसन इंस्टीट्यूटचे एक विश्लेषक जोशुआ मेसरवे यांनी सोमाफोरसोला मुलाखत देताना म्हटलं आहे की,सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळायला हवी कारण त्यांनी हे दाखवून दिलं आहे की ते त्यांचा देश स्वतंत्रपणे चालवू शकतात.त्यामुळे आता ते लोक परत सोमालियामध्ये परततील याची कोणतीही शक्यता नाही.

सोमालीलँडच्या यिंका अडेगोके यांच्या मते ट्रम्प प्रशासन सोमालीलँडला एक स्वातंत्र्य देशाचा दर्जा देण्यासाठी तयार आहे. मात्र त्याबदल्यात ते आपलं धोरणात्मक आणि लष्करी हीत साधू शकतता.चीनशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिकेला सोमालीलँडचा फायाद होऊ शकतो, त्यामुळे ते सोमालीलँडला एक वेगळा देश म्हणून मान्यता देऊ शकतात. सोमालीलँडला वेगळा देश म्हणून मान्यता मिळाल्यास त्याबदल्यात या देशाकडे अमेरिकेला अनेक सवलती मिळण्याची शक्यता आहे, त्याच्या जोरावर अमेरिकेला चीनशी स्पर्धा करणं आणखी सोप होऊ शकतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.