Bangladesh violence : बांगलादेशात पुन्हा हिंदुंच्या घरांवर हल्ले; संतप्त जमावाने घराला लावली आग, फेसबुक पोस्टमुळे वाद
बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा अल्पसंख्यांक हिंदुंच्या (Hindu) घरांवर हल्ले करण्यात आले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार एका फेसबुक (Facebook) पोस्टवरून हा राडा झाल्याचे समोर येत आहे. फेसबुक पोस्टवरून भडकलेल्या जमावाने हिंदुंच्या घरावर हल्ले कले.
ढाका : बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा एकदा अल्पसंख्यांक हिंदुंच्या (Hindu) घरांवर हल्ले करण्यात आले आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार एका फेसबुक (Facebook) पोस्टवरून हा राडा झाल्याचे समोर येत आहे. फेसबुक पोस्टवरून भडकलेल्या जमावाने हिंदुंच्या घरावर हल्ले कले. एक घराला आग देखील लावण्यात आली आहे. नरेलच्या लोहगरा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. संतप्त जमावाकडून मंदिरावर देखील दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र शांतता ठेवण्याचे आवाहन करून देखील जमाव नियंत्रणात येत नसल्याने, अखेर पोलिसांनी घटनास्थळी हवेत गोळीबार केला.पोलिसांच्या गोळीबारानंतर जमाव पांगला. जमावाने एका मंदिराला देखील आग लावल्याची माहिती समोर येत आहे.एका फेसबुक पोस्टमुळे ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घर जाळले
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. एका फेसबुक पोस्टमुळे संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला. त्यांनी यावेळी नरेलच्या लोहगरा परिसरात हिंदुंच्या घरांवर दगडफेक केली. दिगोलिया गावात जमावाकडून एका हिंदुंच्या घराला आग देखील लावण्यात आली. जमावाने घरात घुसून मारहाण देखील केली. त्यानंतर तेथीलच एका मंदिरावर दगडफेक करण्यात आली, तर एका मंदिराला आग लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केला जमाव नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
फेसबूक पोस्ट करणाऱ्याला अटक
संबंधित वादग्रस्त फेसबूक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केले आहे. आकाश साहा असं या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या पोस्टनंतर जमाव आक्रमक होत रस्त्यावर उतरला. जमावाने आकाश साहा याच्या घराला देखील आग लावल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र या परिसरात अद्यापही तणावपूर्ण वातावरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींची चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करा, अशी महिती या प्रकरणात पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.