मी लहानपणी रामायण, महाभारताच्या गोष्टी ऐकल्या होत्या; भारताविषयी कायम आकर्षण वाटायचं: बराक ओबामा

महाविद्यालयीन जीवनात माझे अनेक भारतीय आणि पाकिस्तानी मित्र होते. | Barack Obama

मी लहानपणी रामायण, महाभारताच्या गोष्टी ऐकल्या होत्या; भारताविषयी कायम आकर्षण वाटायचं: बराक ओबामा
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 10:28 AM

वॉशिंग्टन: मी लहानपणापासूनच रामायण आणि महाभारताच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे मला कायम भारताविषयी आकर्षण वाटत होते, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. माझ्या बालपणाची काही वर्षे इंडोनेशियात गेली. त्याठिकाणी मला हिंदू धर्मीयांकडून रामायण (Ramayan) आणि महाभारताशी (Mahabharat) निगडीत अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे बालपणापासूनच माझ्या मनात भारतासाठी विशेष स्थान होते, असे बराक ओबामा यांनी सांगितले. (Barack Obama says I was listening to Ramayana and Mahabharta in childhood)

बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये बराक ओबामा यांनी भारताविषयी त्यांचे अनुभव कथन केले आहेत. भारताचा आकार, जगातील एक सष्टांश लोकसंख्या असलेला देश, दोन हजारापेक्षा जास्त पारपंरिक समूह आणि तब्बल 700 भाषा बोलला जाणारा देश या साऱ्या घटकांमुळे भारताविषयी माझ्या मनात कायमच कुतूहूल होते, असे बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

याशिवाय, मला सुरुवातीपासूनच पूर्वेकडच्या देशांमधील धर्मपद्धतीविषयी जाणून घेण्यात रस वाटायचा. त्यामुळे भारताविषयीचे माझे आकर्षण आणखीनच वाढले. महाविद्यालयीन जीवनात माझे अनेक भारतीय आणि पाकिस्तानी मित्र होते. त्यांनी मला डाळ आणि खिमा बनवायला शिकवला. त्यांच्यामुळे मी बॉलीवूडचे अनेक चित्रपट बघितले होते, अशी आठवणही ओबामा यांनी या पुस्तकात सांगितली आहे.

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर कसं होणारं हा प्रश्न मला पडला होता: ओबामा बराक ओबामा यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात डिसेंबर 2010 मध्ये भारत दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. त्यावेळी बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते.

ही मेजवानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. डॉ. मनमोहन सिंहांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे उशीर होत असल्याचे माझ्या लक्षात आले. निरोप घेण्याची वेळ आली अस मी मिशेलला खुणावलं. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी आम्हाला सोडायला कारपर्यंत आल्या. त्या मंद उजेडात मला थकलेले पंतप्रधान त्यांच्या वयापेक्षा अधिक वृद्ध वाटले. तिथून निघताना ही व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यानंतर कसं होईल हाच प्रश्न माझ्या मनात घोळत होता, असे बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा

राहुल गांधींना देशातील बदनामी कमी पडते म्हणून आता परदेशातही स्वत:ची बदनामी करुन घेतायत: गिरीराज सिंह

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

(Barack Obama says I was listening to Ramayana and Mahabharta in childhood)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.