बेलारूसची रशियाला मदत; रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार? युक्रेनचे टेन्शन वाढले
गेल्या पाच दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या बेलारूसने (Belarus) मोठा निर्णय घेतला आहे. बेलारूसने घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केला आहे. यामुळे आता रशियाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Russia Ukraine War : गेल्या पाच दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या बेलारूसने (Belarus) मोठा निर्णय घेतला आहे. बेलारूसने घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केला आहे. यामुळे आता रशियाचा मार्ग मोकळा झाला आहे. रशिया आपली अण्वस्त्रे बेलारूसमध्ये आणू शकणार आहे. आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करू शकणार आहे. त्यामुळे युक्रेनवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून न्यूक्लियर डेटरंट फोर्सला देखील तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अमेरिकेने याचा विरोध केला असून, असे कुठलेही पाऊल न उचण्याबाबत रशियाला इशारा दिला आहे. तसेच युरोपीयन संघाकडून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. आर्थिक निर्बंध लावण्यात आल्याने रशियाच्या चलनामध्ये डॉलरच्या तुलनेत 30 टक्क्यांची घट झाली आहे.
फ्रान्सचा विरोध
दरम्यान दुसरीकडे बेलारूसने रशियाला आपल्या हद्दीत अण्वस्त्रे तैनात करण्यास परवानगी दिल्यानंतर यांची फ्रान्सकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी बेलारुसच्या अध्यक्षांना फोन करून रशियाला मदत करू नका असे म्हले आहे. मात्र अनेक देशांचा विरोध पतकारून देखील बेलारूसने रशियाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलारूसच्या या भूमिकेमुळे युक्रेनवरील दबाव वाढला आहे. रशियाने बेलारूसच्या हद्दीत अण्वस्त्रे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या या भूमिकेमुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे.
युद्धात युक्रेनचे मोठी हानी
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. रशियाने युक्रेनविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या पाच दिवसांपासून रशियाचे सैनिक युक्रेनची राजधानी कीव आणि इतर शहरांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच मोठ्याप्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. दरम्यान युद्धबंदीसाठी युरोपीयन देशांकडून आता रशियावर दबाव निर्माण करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
युक्रेनहून मराठवाड्यातले 14 विद्यार्थी परतले, आणखी 100 जणांची प्रतीक्षा, कुटुंबीयांचे प्राण कंठाशी
Video : युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीयांना मारहाण, लाथा, बुक्क्या घालतानाचे व्हिडिओ व्हायरल