कोरोनाचे फक्त 49 रुग्ण, तरीही संपूर्ण देशात लॉकडाऊन… जाणून घ्या या देशाचा ‘कोरोना डिफेन्स’ प्लान

कमी रुग्ण असतानाही संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारताचा शेजारी देश भूटानने केला आहे.

कोरोनाचे फक्त 49 रुग्ण, तरीही संपूर्ण देशात लॉकडाऊन... जाणून घ्या या देशाचा 'कोरोना डिफेन्स' प्लान
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 3:10 PM

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. अनेक देशांमध्ये याचा संसर्ग कमी झाला आहे (Bhutan Announce One Week Lockdown). पण, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराने पुन्हा एकदा जगाला चिंतेत पाडलं आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक कोटीच्या पार गेली आहे. पण, तरीही भारतात जवजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण, एक देश असाही आहे जिथे कोरोनाचे 50 पेक्षा कमी रुग्ण आहेत, तरीही तिथल्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथील सरकारने एकदा पुन्हा संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे (Bhutan Announce One Week Lockdown).

इतके कमी रुग्ण असतानाही संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारताचा शेजारी देश भूटानने केला आहे. भूटान भलेही छोटासा देश आहे. पण, भूटानने कोरोनाला नियंत्रित करण्यात यश मिळवलं आहे. आतापर्यंत भूटानमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 500 च्या वर पोहोचलेली नाही. पण, तरीही भूटानने दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावला आहे. इतके कमी रुग्ण असताना देखील भूटानने लॉकडाऊन का लावला? यामागे त्यांचा प्लान आहे जाणून घेऊ –

भूटानमध्ये कोरोनाची स्थिती काय?

भूटानमध्ये इतर देशांच्या तुलनेत खूप कमी रुग्ण आहेत. worldometers.info नुसार, भूटानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण 479 प्रकरणं समोर आली आहेत, ज्यापैकी 430 जण कोरोनामुक्त झाले आहेत. भूटानची लोकसंख्या 7 लाख 75 हजार आहे. तरीही भूटानने कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं. आता संपूर्ण भूटानमध्ये फक्त 49 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तरीही सरकारने हे अतिशय गंभीरतेने घेतलं आहे. गेल्या काही दिवसात येथे कोरोनाची काही नवीन प्रकरणं समोर आली आहेत, त्यानंतर सरकारने तात्काळ लॉकडाऊन जारी केला.

लॉकडाउनचे नियम काय?

थिम्फू आमि पारोच्या फ्लू क्लिनिकमध्ये अनेक रुग्ण समोर आल्यानंतर नॅशनल कोव्हिड-19 टास्कफोर्सने अधिक कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनदरम्यान, सर्व आवश्यक सेवा उपलब्ध असतील आणि काही अत्यावश्यक दुकानंही खुली राहातील. सोबतच सर्व अधिकाऱ्यांनी झोनच्या आधारे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा प्लान काय?

भूटानने पहिलेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलली आहेत. भूटानने पहिल्यांदा एप्रिलमध्ये लॉकडाऊन लावलं होतं. त्यावेळी फक्त एका महिलेमुळे संपूर्ण देश बंद करण्यात आला होता. ही महिला कुवैत येथून भूटानला आली होती. तिच्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती होती. या महिलेने भूटानमध्ये अनेक ठिकाणी प्रवास केला होता. त्यामुळे तिच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीच्या आधारे ती ज्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता होती त्या सर्वांची चाचणी करण्यात आली होती. त्याशिवाय रुग्णांची चांगली देखरेख करण्यात आली. तसेच, आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली (Bhutan Announce One Week Lockdown).

कोरोना आपले हात-पाय पसरवण्यापूर्वीच भूटानने कठोर आणि योग्य निर्णय घेतले. भूटानच्या आरोग्य मंत्र्यालयाने याप्रकरणी तात्काळ पावलं उचलली. त्यामुळे भूटानमध्ये कोरोना जास्त पसरु शकला नाही.

विशेषम्हणजे अजूनपर्यंत भूटानमध्ये कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. भूटान कोरोना संसर्गाचा संशयही आला तरी त्यावर तात्काळ कारवाई करत कोरोनाला पसरण्यापासून रोखतो, त्यामुळे तिथे कोरोनाचे कमी रुग्ण आहेत, असं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर भूटानचे पंतप्रधान लोताए शेरिंग आणि आरोग्य मंत्री दिचेन वांगमो हे दोघेही आरोग्य सेवेतून आले आहेत. त्यामुळे त्यांना या रोगाविरोधात रणनिती बनवणे सोपं झालं, असंही काही विश्लेषक मानतात.

Bhutan Announce One Week Lockdown

संबंधित बातम्या :

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.