AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरात मोठा हाहाकार, अनेक देशांमधल्या सुपरमार्केटवर सर्वात मोठा सायबर अटॅक, रेफ्रिजिरेटर्संच तापमान 50 अंशापर्यंत वाढवलं

मोठी बातमी समोर येत आहे. मोठा सायबर हल्ला झाला आहे. अनेक देशांमधील सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये रेफ्रिजिरेटर्संचं तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअसं पर्यंत वाढवण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

जगभरात मोठा हाहाकार, अनेक देशांमधल्या सुपरमार्केटवर सर्वात मोठा सायबर अटॅक, रेफ्रिजिरेटर्संच तापमान 50 अंशापर्यंत वाढवलं
cyber attackImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 9:43 PM
Share

युरोपमधून मोठी बातमी समोर येत आहे. युरोपमध्ये मोठा सायबर हल्ला झाला आहे. युरोप खंडातल्या तब्बल सात देशांमधल्या सुपरमार्केटवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे. भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यादरम्यान रेफ्रिजिरेटर्संचं तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअसं पर्यंत वाढवण्यात आलं आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ज्यामध्ये युरोपमधील बेल्जियम, लक्जमबर्ग, स्वीडन, एस्टोनिया या सारख्या युरोपमधील देशांचा समावेश आहे. या देशांमधील सुपरमार्केटवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांकडून फ्रीजरला निशाणा बनवण्यात येत आहे. या हल्ल्यांमुळे जिथे-जिथे हल्ला झाला तेथील अनेक फ्रिजरचं तापमान हे 50 अंश सेल्सियसपेक्षा देखील अधिक वाढल्याचं पाहायला मिळालं. या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. हे प्रकरण सायबर हल्ल्याशी संबंधित असल्याची शंका येथील कंपन्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी असाच सायबर हल्ला फ्रान्समध्ये देखील झाला होता.

बेल्जियम आणि लक्जमबर्गमध्ये ज्या कंपन्या सुपरमार्केट चालवतात, त्यांनी या हल्लाबाबत माहिती देताना सांगितलं की, रात्री अचानक एक सायबर हल्ला झाला. या हल्ल्याचा मोठा परिणाम हा इथे असलेल्या हजारो फ्रिजरवर झाला आहे. फ्रिजरमधील अन्नपदार्थ कुलिंग करण्यासाठी जी यंत्रणा काम करते अचानक त्या यंत्रणेचं तापमान हे प्रचंड वाढलं. कुलिंग यंत्रणा ठप्प झाली. फ्रिजरचं तापमान तब्बल 50 अंश सेल्सिअरपर्यंत पोहोचलं. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. हा एक सायबर हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज या कंपन्यांकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान स्वीडन मध्ये देखील अशाच पद्धतीने सुपरमार्केवर हल्ला करण्यात आला आहे. याबाबत बोलताना स्वीडनच्या नॅशनल सायबर सिक्योरिटी सेंटरचे प्रमुख जॉन बिलॉव यांनी सांगितलं की हा एक मोठा सायबर अटॅक आहे. आमची संपूर्ण यंत्रणा याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या हल्ल्यामुळे अनेक देशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी फ्रिजरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे.

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...