AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय कोरोना व्हॅक्सीनला अफगानिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, अलकायदा आणि तालिबानकडून कुरापती का?

भारताकडून मित्र राष्ट्र अफगाणिस्तानला पहिल्या टप्प्यातील कोरोना लसी पोहचल्या आहेत. यानंतर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ट्विट करत भारताचे आभार मानलेत.

भारतीय कोरोना व्हॅक्सीनला अफगानिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका, अलकायदा आणि तालिबानकडून कुरापती का?
| Updated on: Feb 09, 2021 | 4:18 PM
Share

काबुल : भारताकडून मित्र राष्ट्र अफगाणिस्तानला पहिल्या टप्प्यातील कोरोना लसी पोहचल्या आहेत. यानंतर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ट्विट करत भारताचे आभार मानलेत. मात्र, दुसरीकडे अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे भारताकडून मिळालेल्या या कोरोना लसींची सुरक्षितता हे अफगाणिस्तानसमोरील मोठं आव्हान आहे. सालेह यांनी देखील या कोरोना लसीचं क्वेटोचे हल्ले, आयईडी स्फोट आणि दहशतवाद्यांपासून संरक्षण करणं यालाच अधिक प्राधान्य असल्याचं म्हटलंय (Big risk for Indian Corona Vaccine in Afghanistan from Taliban terrorists).

उप राष्ट्रपती सालेह यांच्याआधी अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) हमदुल्ला मोहिब यांनी देखील तालिबानला अफगाणिस्तानमधील शांततेत सर्वात मोठा अडसर असल्याचं म्हटलंय. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून अनेक हत्यांचं सत्र सुरु झालंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या देखरेख आणि संशोधन समितीने नुकताच दिलेल्या अहवालात तालिबानने आपलं आश्वासन मोडलं असल्याचं म्हटलंय. तालिबान आणि अल कायदा पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचाही इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

तालिबानच्या कुरापतींनी भारताचीही चिंता वाढली

तालिबानच्या काही कुरापतींमुळे अफगाणिस्तानसह भारताचीही चिंता वाढली आहे. तालिबानने आयएसआयएल या संघटनेला मदत केल्याचं बोललं जातंय. नुकताच हक्कानी नेटवर्कचा माजी कमांडर शहाब अल-मुजाहिर उर्फ सनउल्लाला जून 2020 मध्ये आयएसआयएलच्या सादिक शाखेचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलंय. त्यामुळे सनउल्ला भारताच्या हद्दीत देखील कुरापती करण्याची शक्यता आहे.

तालिबानने अल कायदाच्या दहशतवाद्यांना देखील आसरा दिलाय. असं असलं तरी मागील काही दिवसात तालिबानच्या नियंत्रणात असलेल्या भागात अल कायदाच्या दहशतवाद्यांची हत्या झाल्याचीही घटना घडलीय. सध्या अफगाणिस्तानमधून अमेरिकेचं सैन्य माघारी परतत आहे. मात्र, हे सैन्या गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्धाची स्थिती तयार होईल, असाही इशारा देण्यात येत आहे.

हेही वाचा :

पाकिस्तानच्या फरार दहशतवाद्यावर अमेरिकेकडून 21 कोटींचं इनाम, अफगाणिस्तानात असा झाला शेवट

अफगाणिस्तान : काबूल विद्यापीठावर दहशतवाद्यांचा हल्ला, 25 जणांचा मृत्यू, चकमक जारी

संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची पुन्हा चीनला धोबीपछाड, महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद

व्हिडीओ पाहा :

Big risk for Indian Corona Vaccine in Afghanistan from Taliban terrorists

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.