भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान, इस्लामिक देशांची संघटना संतप्त
हे प्रकरण वादग्रस्त आणि खोडसाळं असल्याचं लक्षात आल्यानंतर ओआयसीने ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यापैकी एक ट्विटमध्ये त्यांनी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यांचे गंभीर परिणाम आखाती देशात पाहायला मिळाले. हे प्रकरण थेट आता 57 सदस्यीय मुस्लिम देश संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन पर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणामुळे ओआयसीने संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील (India) मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे परिणाम दूरगामी पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात ट्विटवरती ट्रेडिंग सुध्दा चालवण्यात आलं होतं. या प्रकरणामुळे 6 आखाती देशांच्या संघटनेनेही भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली आहे. तसेच अशीही कसल्याही प्रकारची टिप्पणी करण योग्य नाही. विशेष म्हणजे मुस्लिम देश सौदी अरेबियानेही नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. वादग्रस्त विधानानंतर भाजपाने त्यांचं सदस्यपदावरून निलंबित केलं आहे.
काय आहे ओआयसीचं म्हणणं
हे प्रकरण वादग्रस्त आणि खोडसाळं असल्याचं लक्षात आल्यानंतर ओआयसीने ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यापैकी एक ट्विटमध्ये त्यांनी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी आणि मुस्लिमांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा संदर्भ देत मुस्लिमांवर बंदी घातली जात आहे अशा पद्धतीची अनेक ट्विट केली आहेत.
ओआयसीच्या ट्विटमध्ये नेमकं काय आहे
ओआयसी मोहम्मद पैगंबर यांच्या केलेल्या कोणत्याही प्रकारच्या अपमानावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करते. जे काही पक्ष मुस्लिमांयाविरुद्ध हिंसाचार आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना जबाबदार धरले पाहिजे. असं एका ट्विट म्हटलं आहे. ओआयसी भारतीय अधिकाऱ्यांना देशातील मुस्लिम समुदायाच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची हमी देण्यासाठी, त्यांचे हक्क, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख, प्रतिष्ठा आणि प्रार्थनास्थळांचे संरक्षण करण्याचे आवाहन करायला पाहिजे असं दुसरं ट्विट केलं आहे.