kabul Blast : अफगाणिस्तान हादरले! शाळेजवळ जबरदस्त साखळी बॉम्बस्फोट, 25 पेक्षा अधिक विद्यार्थी ठार
काबुल : तालिबानच्या (Taliban) अधिपत्याखालील अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील एका शाळेत सलग तीन बॉम्बस्फोट झाले. यातील पहिला स्फोट हा मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला. दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. स्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. ते आपल्या घरी जात होते. यावेळी प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या एका शिक्षकाने […]
काबुल : तालिबानच्या (Taliban) अधिपत्याखालील अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील एका शाळेत सलग तीन बॉम्बस्फोट झाले. यातील पहिला स्फोट हा मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला. दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. स्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. ते आपल्या घरी जात होते. यावेळी प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या एका शिक्षकाने सांगितले की, या घटनेत 25 हूनअधिक विद्यार्थ्यांचा (Students) मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हा स्फोट राजधानी मधील दस्त-बार्ची परिसरात झाला.
दरम्यान दुसऱ्या एका शिक्षकाने सांगितले की, पहिला स्फोट हा शाळेला निशाणा करण्याशाठी करण्यात आला होता. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या घरी जाण्यासाठी बाहेर पडत होते. त्याच 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना आणि इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असतानाच दुसरा स्फोट झाला. यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मात्र या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. मात्र सामान्यता अशा घटना घडल्यानंतर त्याची जबाबदारी हे इस्लामिक स्टेट ही संघटना घेत असते.
इस्लामिक स्टेटवर संशयाची सुई
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून इस्लामिक स्टेट अॅक्टिव्ह झाली आहे. ही दहशतवादी संघटना जादातर शिया लोकांना आपला निशाना बनवत आहे. येथील शिया लोकांच्या मशीदींवर हल्ला केला जात आहे. अशातर अफगाणिस्तानील तालिबानी सरकारने म्हटले आहे की, दहशतवादी हल्ल्यावर आम्ही कठोर पावले उचलत आहोत. त्यामुळेच सध्या दहशतवादी हल्ले कमी होत आहे. मात्र देशाच्या अनेक ठिकाणी असे हल्ले तर होतच आहे.
याच्याआधी ही झाले आहेत हल्ले. याच्याआधी एप्रिल महिन्यात काबूलमधील सगळ्यात मोठ्या मशीदमध्ये हात बॉम्ब टाकण्यात आला होता. ज्यात अनेक जखमी झाले होते. हा हल्ला पुल-ए-खिश्ती नावाच्या मशीदीवर करण्यात आला होता. जी 18 व्या शतकातील आहे. त्यावेळी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले होते असे काबुल पोलिसाचे प्रवक्ता खालिद जरदान यांनी सांगितलं होतं.