देशात कोरोना ओमिक्रॉनचा कहर सुरु, मास्क वापरण्याची सक्ती मागं; ब्रिटनच्या पंतप्रधानांची घोषणा, बोरिस जॉनसन काय म्हणाले?
देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असतानाच बोरिस जॉनसन यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक नियम मागं घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
नवी दिल्ली: जगभर कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) संसर्गाचा कहर सुरु असताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असतानाच बोरिस जॉनसन यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक नियम मागं घेत असल्याचं जाहीर केलं आहे. नियमावली मागं घेतल्यानं ब्रिटनमध्ये नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती राहणार नाही. ब्रिटनमध्ये 8 डिसेंबरला निर्बंध लावण्यात आले होते. ते देखील मागं घेण्यात आले आहेत. कोविड प्लान बी अंतर्गत ब्रिटनमध्ये निर्बंध लावण्यात आले होते. सरकारनं आता निर्बंध हटवल्यामुळं वर्क फ्रॉम होम संकल्पना देखील बंद करण्यात आली आहे. तर, एखाद्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा व्हायचं असल्यास कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. नागरिकांना आता मास्क वापरण्याचं बंधन नसेल, मात्र त्यांना वापरायचा असल्यास ते वापरू शकतात, असं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे.
एएनआयचं ट्विट
British PM Boris Johnson announces end of COVID-19 measures including mandatory face masks in England
“Our scientists believe that is likely that Omicron wave has now peaked nationally. From now on, Govt is no longer asking people to work from home,” he says pic.twitter.com/NdCE9BIydl
— ANI (@ANI) January 19, 2022
शाळांमध्येही मास्क बंधनकारक नसणार
बोरिस जॉनसन यांनी सरकारनं नागरिकांना मास्क वापरणं बंधनकारक नसल्याचं जाहीर केलं आहे. मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जायचं असल्यास किंवा अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येणार असल्यास तुमच्या स्वत: च्या पसंतीनं मास्क वापरू शकता, असं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. येत्या काही काळात नियमांमध्ये बदल करुन शाळांमध्ये मास्क बंधन कारक असलेला नियम देखील शिथील करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
कोरोना ओमिक्रॉन आकडेवारी आणि विश्लेषण करुन निर्णय
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी संसदेला या निर्णयाची माहिती दिली. दुसरीकडे देशात ओमिक्रॉन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मंत्रिमंडळानं जाहीर केलेला बुस्टर डोस आणि प्लान बी नियमांबद्दल जनतेनं प्रदर्शित केलेल्या मतांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून ब्रिटनमधील प्लान बी निर्बंध शिथील करण्यात येतील.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर क्वारंटाईन होण्याचा कायदा देखील 24 मार्चपासून रद्द करण्यात येईल. बोरिस जॉनसन यांनी कोरोना आता कायम राहणार आहे आणि आपल्याला नियम बदलावे लागतील आणि कोरोना असताना सतर्कतेनं जगण्याचा मार्ग शोधायला हवा. देशात गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी होत आहे. देशात सध्या दररोज 90 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
इतर बातम्या:
Damini squad | खबरदार! महिला, मुलींवर वाईट नजर टाकालं तर… दंडुका घेऊन नागपुरात दामिनी पथक सज्ज
Boris Johnson announces end of COVID19 measures including mandatory face masks in Britain