वेगाने विमान खाली कोसळलं अन् अचानक आगीचे लोळ, धुराचे लोट पसरले, विमानातील सर्वच्या सर्व 62 प्रवासी ठार

दुर्घटनाग्रस्त झालेले ते विमान व्होपास (VOEPASS) लिहॉन्स एरियाज या एअरलाईन्सचे असून एटीआर-27 असे त्याचे नाव होते. या विमानाची प्रवासी क्षमता 68 होती.

वेगाने विमान खाली कोसळलं अन् अचानक आगीचे लोळ, धुराचे लोट पसरले, विमानातील सर्वच्या सर्व 62 प्रवासी ठार
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 9:48 AM

Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 58 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. या विमान दुर्घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ब्राझीलमधील साओ पाउलो या ठिकाणीसाओ पाउलो या ठिकाणी ही दुर्घटना घडली.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले विमान हे विमान कास्केवेल शहरातून साओ पाउलोमधील ग्वारुलहोस या ठिकाणी जात होते. साओ पाउलो या ठिकाणी असणाऱ्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरणार होते. या विमानात एकूण 58 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स प्रवास करत होते. ब्राझीलमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले ते विमान व्होपास (VOEPASS) लिहॉन्स एरियाज या एअरलाईन्सचे असून एटीआर-27 असे त्याचे नाव होते. या विमानाची प्रवासी क्षमता 68 होती.

हवेत गिरक्या घेतल्या आणि मग जमिनीवर आपटलं

ब्राझीलमधील एका टीव्ही चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान कोसळण्याआधी हवेत गिरक्या घेत होतं. त्यानंतर हे विमान खाली कोसळले. हे विमान खाली कोसळल्यानंतर भीषण आग लागली. त्यानंतर बराच काळ धुराचे लोळही सुरु होते. तसेच हे विमान जमिनीवर येत असताना ते अनेक घरांना धडकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशी आणि क्रू मेंबर्स अशा 62 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 7 पथके घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

विमान कंपनीकडून निवेदन जारी

ब्राझीलच्या प्रादेशिक विमान कंपनी व्होएपासने याबद्दल एक निवेदन जारी केले आहे. साओ पाउलोमधील ग्वारुलहोस या ठिकाणी विमानतळावर उतरणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. या विमानात चार क्रू मेंबर्स आणि अन्य 58 प्रवासी होते. हे विमान विन्हेदो या शहरात कोसळले. हा अपघात कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आम्ही मदतीसाठी बचाव पथक पाठवली असून ते मदतकार्य करत आहेत, अशी माहिती त्या विमान कंपनीने दिली.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण जगात हळहळ व्यक्त केली जात आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला यांनीही याबद्दल दु:ख व्यक्त केले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी उभे राहून दोन मिनिटं मौन पाळण्यास सांगितले. हा अपघात नेमका कसा झाला, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मानवी चुकांमुळे हे विमान कोसळल्याचं म्हटलं जात आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.