Tipu Sultan: टिपू सुलतानची तलवार ब्रिटन परत करणार; चोरलेली 7 शिल्पंही भारतात येणार ; कलाकृत्तींची झाली होती चोरी

ब्रिटेनमधून या वस्तू भारतात जातील त्याबद्दल डंकन डोर्नन यांनी सांगितले की, या गोष्टी भारतापर्यंत पोहोचणार असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याचा करण्याचा एक नवा मार्ग खुला झाला आहे, त्यामुळे दोन्ही देशामधील सहकार्य वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tipu Sultan: टिपू सुलतानची तलवार ब्रिटन परत करणार; चोरलेली 7 शिल्पंही भारतात येणार ; कलाकृत्तींची झाली होती चोरी
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 1:58 PM

मुंबईः ब्रिटनने भारतातून चोरलेली सात शिल्पं आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या कलाकृती (sculptures and historical artefacts from Tipu sword) आता परत करण्याचे त्यांच्याकडून मान्य करण्यात आले आहे. ही शिल्पं आणि कलाकृती ग्लासगोच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या. भारतीय उच्चायुक्तांच्या पथकाकडून केल्व्हिंग्रोव्ह आर्ट गॅलरी (Kelvingrove Art Gallery) आणि संग्रहालयाबरोबर करार केल्यानंतर या कलाकृती भारतात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.ब्रिटनमधून (Britain) भारतात येणारी ही पहिलीच कलाकृती असल्याचेही सांगण्यात येत आहे. या गोष्टीमुळे भारतातून अनेक गोष्टी चोरून ब्रिटनमध्ये घेऊन जाण्यात आल्या होत्या, त्या वस्तू आणि कलाकृत्ती आता भारतात आणता येतील अशी आशा असल्याचे सांगण्यात येत आहे. या कलाकृती आणि शिल्पं कानपूर, कोलकाता, ग्वाल्हेर, बिहार आणि हैदराबाद येथून आणण्यात आली आहेत.त्यापैकी अनेक शिल्पं आणि कलाकृत्ती या 1000 वर्षे जुने असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

टिपूची तलवार आणि म्यान

ब्रिटनमध्ये असलेल्या भारताच्या कलाकृत्तीमध्ये 14व्या शतकातील दगडी शिल्पं आणि 11 व्या शतकातील दगडी फलकांचा यामध्ये समावेश आहे. 19 व्या शतकात मंदिरं आणि देवस्थानांमधून या कलाकृत्ती चोरीला गेल्या होत्या. त्यामध्ये टिपू सुलतानची तलवार आणि म्यान यांचाही समावेश होता. त्या वस्तू आता भारताकडे परत करण्यात येणार आहेत.

Historical items

पंतप्रधानांनी चोरल्या होत्या वस्तू

1905 मध्ये हैदराबाद येथील निजामाच्या संग्रहालयातून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी या कलाकृत्ती चोरण्यात आल्या होत्या.त्यानंतर त्यांनी ते ब्रिटीश जनरल आर्चिबाल्ड हंटर यांना विकण्यात आले होते. त्यानंतर या सर्व कलाकृती ग्लासगो संग्रहालयाला भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. या कलाकृत्तींविषयी ग्लासगो म्युझियमकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, या कलाकृती आणि शिल्पं कानपूर, कोलकाता, ग्वाल्हेर, बिहार आणि हैदराबाद येथून आणण्यात आली आहेत.त्यापैकी अनेक शिल्पं आणि कलाकृत्ती या 1000 वर्षे जुने असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीचा वारसा

केल्व्हिंग्रोव्ह येथील एका समारंभात या कलाकृती भारताला सुपूर्द करण्याची घोषणा करण्यात आली असून या गोष्टीचे स्वागत करताना लंडनमधील भारताचे कार्यवाहक उच्चायुक्त सुजित घोष हे म्हणाले की, ही शिल्पं आणि कलाकृती भारतीय संस्कृतीचा वारसा आहेत, आता या वस्तू थेट भारतात पाठवण्यात येणार असल्याने ऐतिहासिक वास्तूंमध्ये महत्वाची भर पडणार आहे. या वस्तू परत करण्यात येत असल्याने सुजित घोष यांनी ग्लासगो लाईफ आणि ग्लासगो सिटी कौन्सिलचे आभार मानले आहेत.

ब्रिटनमधून चोरलेल्या कलाकृती भारतात

ग्लासगो संग्रहालयाचे प्रमुख डंकन डोर्नन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ग्लासगो पहिल्यांदाच एखाद्या देशातून चोरलेल्या मूर्ती परत करत नाही. तर गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया येथे सुरू आहे. त्याचा लकोटा आदिवासींना त्यांचा घोस्ट शर्ट अर्थात भूत शर्ट 1998 मध्ये परत करण्यात आला आहे. ऐतिहासिक वास्तू आणि शिल्पं परत करण्याच्या ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. या निर्णयामुळे मानवी नातेसंबंधात विश्वासही निर्माण केला जातो.

ब्रिटनकडे याबाबत माहिती नाही

या वर्षाच्या अखेरीस या वस्तू भारतात परत येणार असून डोर्नन यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, हा करार महत्त्वाचा असून ब्रिटनमधील संग्रहालयातून प्रथमच या कलाकृती भारतात परत केल्या जात आहेत. जरी आमच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नाही, मात्र भारतात या वस्तू पोहोचल्यानंतर या गोष्टी कशा वापरल्या जातील याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. मात्र या वस्तू प्रचंड महत्वाच्या असल्याचेही त्यांनी सांगितले. या वस्तू भारतात परत जात असल्याने हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण असून ग्लासगोसाठीही त्याचे महत्त्व आहे. आणखी काही कलाकृती परत करण्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन्ही देशातील संबंध आणखी सुधारणार

ब्रिटेनमधून या वस्तू भारतात जातील त्याबद्दल डंकन डोर्नन यांनी सांगितले की, या गोष्टी भारतापर्यंत पोहोचणार असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याचा करण्याचा एक नवा मार्ग खुला झाला आहे, त्यामुळे दोन्ही देशामधील सहकार्य वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.