एका गोळीनं उडवले ISISचे 5 दहशतवादी, ब्रिटिश SAS स्नायपरची कमाल
जवानानं एका गोळीमध्ये 900 मीटर अंतरावरील ISISच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
नवी दिल्ली : ब्रिटनची स्पेशल एअर सर्व्हिस (SAS)चा बहाद्दर स्नायपरच्या नेमबाजीची जगभरात चर्चा होत आहे. या जवानानं एका गोळीमध्ये 900 मीटर अंतरावरील ISISच्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ज्यात एक ISISचा कमांडरही होता. या जवानानं आत्मघाती हल्लेखोराच्या स्फोटकांनी भरलेल्या जॅकेटवर त्यावेळी गोळी मारली जेव्हा तो कॅमेरावर एक मेसेज रेकॉर्ड करत होता. त्यावेळी आत्मघाती हल्लेखोरासोबत असलेले अन्य 4 दहशतवादीही मारले गेले.(British SAS sniper kills 5 terrorists of ISIS)
20 वर्षाच्या या जवानानं हा कारनामा इस्लामिक स्टेट विरोधात नोव्हेंबरमध्ये केला होता. त्यावेळी त्याने सैन्याच्या सर्वात ताकदवान आणि वैशिष्ट्यपूर्ण रायफलचा वापर केला होता. SASच्या जवान ग्रामीण भागातील हल्ल्यांना जबाबदार असलेल्या ISIS च्या युनिटविरोधात लढत होते. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार स्नायपरने बॅरेट .50 कॅलिबर रायफलचा वापर केला होता. ही बंदूक सर्वात ताकदवान मानली जाते.
या बंदुकीच्या गोळीचा माणसावरील परिणाम
सर्वसाधारणपणे या बंदुकीचा वापर दूरवरील निशाण्यासाठी केला जातो. त्यात विमान, कार, ट्रक अशा निशाण्याचा समावेश असतो. माणसांवर याचा मोठा वाईट परिणाम होतो. या बंदुकीचा एक सिंगल राऊंडच माणसाला मृत्यूशय्येवर झोपवतो. मिळालेल्या माहितीनुसार SASची एक टीम ISISच्या संशयित बॉम्ब फॅक्ट्रीवर नजर ठेवून होती. त्यावेळी हे पाच दहशतवादी फॅक्ट्रीतून बाहेर जाताना दिसले. त्यातील एक आत्मघाती हल्ल्याबाबत कॅमेरात मेसेज रेकॉर्ड करत होता. तो हसत होता आणि कॅमेरासमोर बोलत होता.
एका दहशतवाद्याला मारण्याची होती योजना
SASच्या जवानानं आपल्या बेसवर या गोष्टीची सूचना दिली होती आणि सांगितलं होतं की त्याच्या निशाण्यावर काही दहशतवादी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘त्यावेळी आत्मघाती हल्लेखोराला मारण्याची आणि त्यानंतर जर त्याच्या नेत्याची ओळख पटली तर त्यालाही निशाणा बनवण्याची योजना होती. पण आम्ही नशीबवान आहोत की निशाणा दुरुन साधला गेला. स्नायपरने हवेत निशाणा साधला आणि आरामात ट्रिगर दाबला. योजना आत्मघाती हल्लेखोराला मारण्याची होती पण धूळ बाजूला झाली तेव्हा अन्य चार दहशतवादीही मारले गेल्याचं पाहायला मिळालं.’
संबंधित बातम्या :
चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला
America: नशीब असावं तर असं, सहा आकड्यांनी बदलला खेळ, एका रात्रीत अब्जाधीश
British SAS sniper kills 5 terrorists of ISIS