चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, औषधांचा तुटवडा, कोल्ड स्टोरेज फुल्ल, मृतदेहाचा खच, संपूर्ण जग हायअलर्टवर…

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, जगभर सतर्कता...

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, औषधांचा तुटवडा, कोल्ड स्टोरेज फुल्ल, मृतदेहाचा खच, संपूर्ण जग हायअलर्टवर...
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 9:48 AM

मुंबई : 2020, 2021 वर्षात कोरोनामुळे जग होरपळलं. सर्वत्र भितीचं वातावरण होतं. त्यानंतर हळूहळू कोरोनाची लाट ओसरली. आता तर भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं प्रमाण नाममात्र राहिलं होतं. पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट (China Coronavirus) पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष (India Corona) काळजी घेतली जात आहे.

चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. आरोग्यव्यवस्था अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताटकळत पडले आहेत. एकंदरीत आपत्तीजनक परिस्थिती आहे.

चीनमधील कोरोना रूग्णसंख्या पाहता जगभरात सतर्कता बाळगली जात आहे. खबरदारी घेतली जात आहे.

भारतात खबरदारी

चीनमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता भारतातही खबरदारी घेतली जातेय.परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. जर एखादा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.

आज महत्वपूर्ण बैठक

चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारतात वेळेतच काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. यात कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

देशात सध्या केवळ 112 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. एकूण सक्रीय रूणांची संख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. पण ही संख्या कायम राखणं आणि कमी करणं गरजेचं आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.