भारतासोबतचा सीमाप्रश्न द्विपक्षीय, भारत-अमेरिका चर्चेनंतर चीनचा जळफळाट

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी भारत-चीनचा प्रश्न द्विपक्षीय असल्याचे म्हटले आहे. लडाख येथील सीमेवरील दोन्ही देशांतील वाद हा द्विपक्षीय मुद्दा आहे, असं चीनने म्हटले आहे. (China criticised America said Galwan valley is bilateral issue they should not intervene)

भारतासोबतचा सीमाप्रश्न द्विपक्षीय, भारत-अमेरिका चर्चेनंतर चीनचा जळफळाट
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 11:47 AM

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये 2+2 स्तरावरिल चर्चा झाल्यांनंतर चीनचा जळफळाट झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी भारत-चीनचा प्रश्न द्विपक्षीय असल्याचे म्हटले आहे. लडाख येथील सीमेवरील दोन्ही देशांतील वाद हा द्विपक्षीय मुद्दा आहे. अमेरिकेने त्यांची हिंदी आणि पॅसिपिक महासागरातील रणनिती थांबवावी, असं वक्तव्य चीनने केले आहे. (China criticised America said Galwan valley is bilateral issue they should not intervene)

वांग वेनबिन यांनी अमेरिकेच्या हिंदी आणि पॅसिफिक महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या धोरणावर टीका केली. “अमेरिकेची हिंद-पॅसिफिक महासागरातील रणनिती शीतयुद्धाची मानसिकता दर्शवते आणि ते भू-राजनैतिक डावपेंचांचा प्रचार करत आहेत . दोन्ही महासागरांमध्ये अमेरिकेचे प्रभुत्व प्रस्तापित करण्याची खेळी आहे. याचा दोन्ही क्षेत्रांना फटका बसू शकतो. आम्ही अमेरिकेला ही खेळी थांबवण्याचे आवाहन करतो, असं वांग वेनबिन यांनी केले आहे.

भारत चीन सीमेवरिल स्थिती सामान्य असून दोन्ही देशांमध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अस वांग वेनबिन म्हणाले.

अमेरिकेची चीनवर टीका

भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या चर्चेत चीन हा भारत आणि अमेरिकेसारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशांच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे वक्तव्य माईक पोम्पिओ यांनी केले होते.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान शहीद झाल्यावरुन चीनवर टीका केली. पोम्पिओ म्हणाले की ” आमच्या देशाचे नेते आणि नागरिक स्पष्टपणे चीनची कम्युनिस्ट पार्टी लोकशाहीच्या बाजूने नाहीत, असं मानतात”. भारत आणि अमेरिका चीनमुळे निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या संकटाना तोंड देण्यासाठी तयार असून त्यादृष्टीने मजबूत पावलं टाकली जात आहेत, असं पोम्पिओ म्हणाले.

दरम्यान,अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशातील भविष्यातील संबंध मजूबत करण्यासाठी ही भेट महत्वाची ठरणार आहे. भारत अमेरिकेतील 2+2 चर्चेमध्ये राजनाथ सिंह, एस.जयशंकर यांनी माईक पोम्पिओ आणि मार्क एस्पर यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक, जागतिक प्रश्न आणि चीन विषयी चर्चा केली.

संबंधित बातम्या :

चीन मंदीच्या उंबरठ्यावर, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शेजारी राष्ट्रांच्या कुरापती

संयुक्त राष्ट्रात चीनची पत खालावली, मानवहक्क परिषदेच्या निवडणुकीत सर्वात कमी मतं

(China criticised America said Galwan valley is bilateral issue they should not intervene)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.