चीन ‘सुपर सोल्जर्स’ची तुकडी उभारणार? सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बायोलॉजिकल टेस्ट
चीनला आर्थिक, सामरिक आणि तंत्रज्ञानाच्या बळावर अमेरिका आणि उर्वरित जगावर वर्चस्व गाजवायचे आहे. | John Ratcliffe
वॉशिंग्टन: लडाखसारख्या उंचीवरील आणि दुर्गम प्रदेशात भारताला शह देण्यासाठी आता चीनकडून ‘सुपर सोल्जर्स’ तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी चीनकडून सैनिकांच्या जैविक चाचण्या (biological tests) सुरु असून या माध्यमातून सैनिकांची शारीरिक क्षमता वाढवली जाणार आहे. (China doing biological tests to create super soldiers)
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी ‘वॉल स्ट्रीट जनरल’ या दैनिकासाठी लिहलेल्या लेखात हा खुलासा केला आहे. चीनला आर्थिक, सामरिक आणि तंत्रज्ञानाच्या बळावर अमेरिका आणि उर्वरित जगावर वर्चस्व गाजवायचे आहे. सध्याच्या घडीला चीनमधील प्रमुख सार्वजनिक उपक्रम आणि कंपन्यांनी एक मायाजाल विणले आहे. या सगळ्याआड सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून अनेक उद्योग सुरु आहेत. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चीन अत्यंत टोकाच्या पातळीला जाऊन पोहोचल्याचे रॅटक्लिफ यांनी म्हटले आहे.
सुपर सोल्जर्स म्हणजे नेमके काय? जॉन रॅटक्लिफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनकडून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांच्या मोठ्याप्रमाणावर जैविक चाचण्या (biological tests) केल्या जात आहेत. या माध्यमातून चीनला मानवी क्षमता विस्तारलेले आणि सामर्थ्यशाली ‘सुपर सोल्जर्स’ निर्माण करायचे आहेत. सामर्थ्यशाली होण्यासाठी चीनने नैतिकतेच्या सीमा ओलांडल्याचे जॉन रॅटक्लिफ यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या थेट आरोपामुळे अमेरिका-चीनमधील तणाव शिगेला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसाठी चीनला जबाबदार धरले होते. चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरस सर्वप्रथम आढळून आला होता. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाला ‘चायना व्हायरस’ संबोधत हेटाळणी केली होती. त्यांनी चीनवर अनेक निर्बंधही लादले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
लडाखच्या थंडीत चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याची जय्यत तयारी
पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चीनसमोर उभ्या ठाकलेल्या भारतीय सैन्याने थंडीच्या मोसमाचा सामना करण्यासाठी विशेष तयारी केली आहे. लडाखमध्ये हाडे गोठवणाऱ्या थंडीत पहारा देणाऱ्या सैनिकांना विशेष थर्मल सूट देण्यात आले आहेत. याशिवाय, लडाखच्या परिसरात सैनिकांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी शेल्टर्सही उभारण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या:
Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात
लडाख-सियाचीनमध्ये जवानांना थंडीच्या कपड्यांच्या कमतरतेची तक्रार, संसदीय समिती लडाख दौऱ्यावर जाणार
लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था
(China doing biological tests to create super soldiers)