काय? कोरोनाच्या चाचणीसाठी चीनमध्ये ‘Anal Swab’? नागरिकांच्या पेंग्विनचालीच्या व्हिडीओवर चीन म्हणतोय…

चीनी नागरिकांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे चीनी लोक ‘पेंग्विन’प्रमाणे चालताना दिसत आहेत.

काय? कोरोनाच्या चाचणीसाठी चीनमध्ये 'Anal Swab'? नागरिकांच्या पेंग्विनचालीच्या व्हिडीओवर चीन म्हणतोय...
चीनने सध्या कोरोना चाचणीसाठी घसा किंवा नाकातून स्वॅब न घेता गुद्द्वारामार्गे स्वॅब घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 7:32 PM

मुंबई : चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अवघ्या जगाचं कंबरडं मोडलं आहे. यातच आता चीनी नागरिकांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे चीनी लोक ‘पेंग्विन’प्रमाणे चालताना दिसत आहेत. चीनने सध्या कोरोना चाचणीसाठी घसा किंवा नाकातून स्वॅब न घेता गुद्द्वारामार्गे स्वॅब घेण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. याचाच परिणाम म्हणून लोक असे चालत असल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओतून केला जात आहे. मात्र चीनने हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हणत हा दावा फेटाळून लावला आहे (China People walking like penguin after anal swab corona test viral video).

एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तपासण्यासाठी त्या व्यक्तीचे नाक किंवा घशातील नमुने घेतले जात होते. पण आता नाक किंवा घसा नाही तर थेट Anal Swab घेतले जात आहे. चीनमध्ये  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीची पद्धत काहीशी बदलण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा स्वॅब आता घसा किंवा नाकाऐवजी गुद्द्वारातून घेतला जाणार आहे. हा कोरोना चाचणीचा एक प्रकार असून यामुळे कोरोनाचं निदान अधिक अचूकपणे होणार असल्याचा दावा चिनी अधिकाऱ्यांनी केला आहे.

चीनने फेटाळला दावा

चीनच्या सरकारी टीव्ही चॅनल सीसीटीव्हीच्या अहवालानुसार, चिनी अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून हा व्हिडीओ हटवला असून, तो खोटा असल्याचे म्हटले आहे. मात्र हे लोक असे वाकून ‘पेंग्विन’ प्रमाणे का चालत आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हा व्हायरल व्हिडीओ उत्तर चीनच्या हेबेई प्रांताची राजधानी शिझियाझुआंगचा असून तो 28 जानेवारी रोजी चित्रित करण्यात आला, असे म्हटले जात आहे. सेन्सॉर करण्यापूर्वी हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला होता. अद्यापही युट्यूबवरून हा व्हिडीओ हटवण्यात आलेला नाही (China People walking like penguin after anal swab corona test viral video).

कशी होणार ही नवी चाचणी?

चीननं सुरू केलेल्या कोरोनाच्या नव्या चाचणीत 1 ते 2 इंचाचा कापसाचा स्वॅब गुदमार्गात सोडला जातो. ही प्रक्रिया नाक किंवा घश्यातील स्वॅब घेण्याच्या प्रक्रियेच्या तुलनेत अत्यंतिक त्रासाची आणि गैरसोयीची असल्याची तक्रार काहींनी केली आहे. कोरोनाच्या या नव्या चाचणी पद्धतीच्या कार्यक्षमतेवर वैदयकीय अधिकाऱ्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा विषाणू श्वसनमार्गाच्या तुलनेत गुदमार्ग किंवा मलमूत्रात अधिककाळ जिवंत राहतो, त्यामुळे अभ्यासानंतर हे नवे तंत्र चिनी अधिकाऱ्यांकडून अवलंबण्यात येत आहे. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, या विषाणूचा धोका असलेला 1000 शाळकरी मुलांचा गट आणि शिक्षकांचीही अशाच पद्धतीने चाचणी करण्यात आली. तर, यादरम्यानच हा व्हायरल व्हिडीओ चित्रित झाल्याचे बोलले जात आहे.

(China People walking like penguin after anal swab corona test viral video)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.