AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीनकडून ‘स्टील्थ बॉम्बर’च्या चाचण्या, अणु बॉम्ब टाकण्यासह काय क्षमता?

चीन (China) सध्या अणु बॉम्ब टाकण्याची क्षमता असलेल्या स्टील्थ बॉम्बर (Stealth Bomber) विमानाच्या निर्मितीचं काम करत आहे.

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीनकडून ‘स्टील्थ बॉम्बर’च्या चाचण्या, अणु बॉम्ब टाकण्यासह काय क्षमता?
| Updated on: May 27, 2021 | 2:34 AM
Share

बीजिंग : चीन (China) सध्या अणु बॉम्ब टाकण्याची क्षमता असलेल्या स्टील्थ बॉम्बर (Stealth Bomber) युद्ध विमानाच्या निर्मितीचं काम करत आहे. हे स्टील्थ बॉम्बर युद्ध विमान अमेरिकेसाठी (America) धोक्याची घंटा असल्याचं बोललं जातंय. कारण या युद्धविमानाचा उपयोग करुन चीन अमेरिकेच्या ठिकाणांवर सहजपणे अणु बॉम्ब (Nuclear Strikes) टाकू शकणार आहे. एका सैन्य तज्ज्ञानेच याबाबत खुलासा केलाय. त्यामुळेच मोठ्या काळापासून चीन सोबत वाद सुरु असलेल्या अमेरिकेच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यता आहे (China release Photo of War plane Stealth Bomber America in worry).

जियान एच-20 स्ट्रॅटेजिक बॉम्बर (Xian H-20 strategic bomber) युद्ध विमानाची नवी कम्प्यूटर जनरेटेड फोटो चीनचा संरक्षण विभाग ‘नोरिन्को’कडून (Norinco) जारी करण्यात आलेत. चीनच्या पुढच्या पीढितील युद्ध विमानाचा हा पहिलाच फोटो आहे. हे विमान तयार करण्यासाठी चीनकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. या फोटोवरुन बॉम्बरमध्ये 4 वेपन बे लावण्यात आल्याचं दिसतंय. याशिवाय 2 अॅडजस्टेबल टेल विंग्स, एक हवाई रडार आणि कॉकपिटच्या दोन्ही बाजूला 2 एअर इनटेक लावण्यात आलेत. याचं डिझाईन अमेरिकेच्या USAF B-2 Spirit सारखं आहे.

चीनच्या स्टील्थ बॉम्बरचं वैशिष्ट्यं काय?

‘नोरिन्को’ मॅगझीनच्या फ्रंट कव्हरवर या स्टील्थ बॉम्बरला ‘आकाशातील युद्धदेवता’ असं म्हटलं आहे. चीनचं स्टील्थ बॉम्बर विमानावर गडद रंगाचे रडार-एबसोर्बेंट मटेरियल लावण्यात आलेत. याशिवाय याचं डिझाईन रडारला चकवा देईल असं तयार करण्यात आलंय. जियान एच-20 स्ट्रॅटेजिक बॉम्बर अण्वस्त्र, हायपरसोनिक आणि क्रूज मिसाईल घेऊन जाण्यास सक्षम आहे. हे विमान जास्तीत जास्त 200 टनापर्यंतचं वजन घेऊन उड्डाण करु शकतं. याचा सर्वाधिक वेग 980 किलोमीटर प्रतितास असेल.

आशिया-प्रशांत महासागर भागात अमेरिकेसाठी धोका

आशिया-प्रशांत महासागर भागातील संरक्षण तज्ज्ञ जॉन ग्रेवेट म्हणाले, “या युद्धविमानाचे फोटो पाहून या विमानाचा मुख्य हेतू लपून प्रवास करण्याचा दिसतोय. याचा अर्थ हे विमान एक रणनीती म्हणून बॉम्बवर्षावर करत हल्ले करण्यास सक्षम आहे. अशाप्रकारे हे विमान दूरपर्यंत हल्ला करु शकेल.

हेही वाचा :

तैवानच्या अवकाशात अमेरिकेचे बॉम्बर युद्ध विमान, अमेरिकेचं चीनला आव्हान, तैवानच्या माध्यमांचा दावा

भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, लडाख सीमेवर राफेल तैनात होणार

राजस्थानमध्ये वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं

व्हिडीओ पाहा :

China release Photo of War plane Stealth Bomber America in worry

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.