AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs China: वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनची कुरापत, आपल्या सैन्याच्याजवळ आले होते लढाऊ विमान, एयरफोर्स एक्टिव्ह झाल्यावर पळाले..

रडारवर चिनी विमान दिल्यासनंतर लगेचच प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलही एक्टिव्ह झाले. हवाई दलाने ही घुसखोरी समजत, चिनी विमानाला पाडण्य़ासाठी क्षेपणास्त्र कार्यान्वित करण्यात आली. मात्र भारतीय सैन्याच्या इशाऱ्यानंतर चिनी एयरक्राफ्ट माघारी परतले.

India vs China: वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनची कुरापत, आपल्या सैन्याच्याजवळ आले होते लढाऊ विमान, एयरफोर्स एक्टिव्ह झाल्यावर पळाले..
चिनी सैन्याची कुरापत Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 11:07 PM

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC)चीनने भारतीय सैन्याला (Indian Army) चिडवणारी कुरापत केली आहे. या ठिकाणी चीनकडून (China)युद्धाभ्यास करण्य़ात येतो आहे. यात एक लढाऊ विमान आपल्या सैन्याजवळून गेले, आपले हवाईदल सक्रिय झाल्यानंतर हे एयरक्राफ्ट निघून गेले. ही घटना जूनच्या अखेरीस झाल्याचे सांगण्यात येते आहे. माध्यमांना या सगळ्याची माहिती शुक्रवारी मिळाली आहे. या घटनेनंतर भारताने चीनसमोर याबाबत नाराजी आणि हरकत व्यक्त केली आहे. सोबतच भविष्यात असा प्रकार घडू नये असा इशाराही दिलेला आहे. खरंतर या प्रसंगामुळे चीनच्या हवाई दलाने एलएसीजवळ युद्धसराव केल्याचे समोर आले आहे. या युद्ध सरावात हवाई सुरक्षा हत्यारांचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याची माहिती आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चीनचे एक विमान एलएसीवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या सैनिकांच्या अगदी जवळ आले होते. रडारवर चिनी विमान दिल्यासनंतर लगेचच प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलही एक्टिव्ह झाले. हवाई दलाने ही घुसखोरी समजत, चिनी विमानाला पाडण्य़ासाठी क्षेपणास्त्र कार्यान्वित करण्यात आली. मात्र भारतीय सैन्याच्या इशाऱ्यानंतर चिनी एयरक्राफ्ट माघारी परतले.

सैन्यातील यंत्रणा सक्रिय

भरातीय सैन्याच्या वतीने नियमानुसार पहिल्यांदा हा मुद्दा चिनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, अशी ताकीदही देण्यात आली. या घटनेनंतर केंद्र सरकारने अशा कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या सूचना सैन्यदलाला दिल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

गलवानमध्ये १५ जून २०२० रोजी झाली होती चकमक

त्या दिवशी गलवानमध्ये भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यावरही दबाव होता. ज्या ठिकाणी चिनी सैन्य बसले होते, तिथून त्यांनी परतावे, असे भारतीय सैन्याचे म्हणणे होते. चिनी सैन्याने ते ऐकलेही होते, मात्र त्यांच्या कुरापतीनेच संघर्षाला सुरुवात झाली. चीनने तरीही तिथे दोन टेन्ट लावले, जसे काही ते निरिक्षकाच्या भूमिकेत होते. जर आम्ही परतलो तर तुमच्या हालचालींवर नजर ठेवता येणार नाही, असा तर्क त्यावेळी चिनी सैनिकांकडून देण्यात आला. भारतीय सैन्याने याला विरोध केल्यानंतर चकमक झाली. चिनी सैनिकांकडे हत्यारे होती तर भारतीय सैन्य जुन्या अनुभवाच्या आधारावर तिथे होती. या चकमकीनंतर ३० जूननंतर दोन्ही देशांत चर्चा झाली आणि चीन सैन्य तिथून एक किलोमीटर अंतरावर माघारी परतले. भारतीय सैन्य त्यांच्या चौकीवर परतले. तेव्हापासून उच्चस्तरीय चर्चा सुरु असली तरी त्यावर तोडगा निघालेला नाही.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.