Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

शेजारील देश पाकिस्ताननेही तिथल्या नागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Corona Vaccine | 'या' देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 2:48 PM

नवी दिल्ली : संपूर्ण जगावर सध्या कोरोना विषाणूचं सावट आहे (Free Corona Vaccination). यावर आता फक्त कोरोना लशीचा आधार आहे. त्यामुळे अनेक काळापासून संपूर्ण जग कोरोनावरील लस कधी येणार या प्रतिक्षेत आहे. गेल्या वर्षभरापासून जगभरातील वैज्ञानिक कोरोनाची लस बनवण्याच्या प्रयत्नात आहे. आनंदाची बातमी म्हणजे अनेक कंपन्यांच्या लशी शेवटच्या टप्प्यात आहेत. तर, ब्रिटनमध्ये फायझर लशीच्या वापरास हिरवा कंदिलही दाखवण्यात आला आहे (Free Corona Vaccination).

ब्रिटन (Britain) फायझर आणि बायोएनटेकच्या कोव्हिड-19 लशीच्या वापराला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), 100 पेक्षा अधिक लशींवर काम सुरु आहे. कोरोनापासून बचावासाठी काही देशांनी आपल्या नमागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे. कोण-कोणते आहेत ते देश ज्यांनी आपल्या नागरिकांना मोफत लसीकरणाचं वचन दिलं आहे?

फ्रान्स

काहीच आठवड्यांमध्ये देशात कोव्हिड-19 च्या लसीकरणाचं काम सुरु होईल. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस टोचण्यात येईल. लसीकरणाचं काम तीन टप्प्यात पूर्ण होईल, अशी घोषणा फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी गेल्या गुरुवारी (26 नोव्हेंबर) केलं.

जपान

जपान सरकारने नागरिकांना मोफत लस टोचण्यासाठी एक प्रस्ताव पारित केला आहे. या प्रस्तावानुसार, सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्यात येईल. त्यानुसार, जपानच्या जवळपास 12 कोटी जनतेला कोरोनाची लस मिळेल (Free Corona Vaccination).

अमेरिका

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेले जो बायडन यांनीही नागरिकांना मोफत लस देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, अमेरिकेत त्यांनाच मोफत लस मिळेल ज्यांचा आरोग्य विमा नसेल. अमेरिकेत जवळपास 1 कोटी 43 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 2 लाख 78 हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

नॉर्वे

उत्तरी युरोपमधील नॉर्वेनेही देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. जेव्हाही कोरोना लस उपलब्ध होईल तेव्हा देशातली सर्व नागरिकांना मोफत ती लस उपलब्ध करुन देण्यात येईल. याला राष्ट्रीय लसीकरण योजनेतही समाविष्ट करण्यात येईल, असं नॉर्वे सरकारने ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं (Free Corona Vaccination).

पाकिस्तान

शेजारील देश पाकिस्ताननेही तिथल्या नागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यासाठी पाक सरकार अभियान चालवण्याची तयारी करत आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून या अभियानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारतातील स्थिती काय?

कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वहिली लस दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.

ऑनलाईन कळणार कोरोना लसीचा साठा!

कोरोनाच्या लसीकरणासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. लसीचा साठा आणि त्याची मागणी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचलित केली जाणार आहे. या लसीकरण अभियानाबद्दल देशात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी मिळून अफवेपासून दूर राहावं, आणि जनतेलाही जागरुक करावं अशी मागणी त्यांनी केली.

Free Corona Vaccination

संबंधित बातम्या :

कोरोनावरील लसीकरणासाठी अमेरीकन नागरिकांवर जबरदस्ती केली जाणार नाही : जो बायडन

भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात, पंतप्रधानांची खुशखबर, किंमत-लसीकरण प्लॅनचीही माहिती

“कोरोना लसीला मंजुरी दिली असली तरी संघर्ष संपलेला नाही, लसीकरणाचं मोठं आव्हान”: बोरिस जॉनसन

फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.