Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा चंद्रावर झेंडा, सोशल मीडियावर Congratulations Neighbors…चा ट्रेंड; पाकिस्तानशी कनेक्शन काय?

भारताची चांद्रयान -3 ही मोहीम यशस्वी झाली आहे. भारताचं मिशन मून यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण जगातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचा कट्टर वैरी असलेल्या पाकिस्तानकडूनही भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारताचा चंद्रावर झेंडा, सोशल मीडियावर Congratulations Neighbors...चा ट्रेंड; पाकिस्तानशी कनेक्शन काय?
​Chandrayaan 3Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 6:39 PM

कराची | 24 ऑगस्ट 2023 : भारताने अखेर चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. बलाढ्य रशियाचं लुना-25 क्रॅश झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात भारताने चंद्रावर स्वारी करण्याचा इतिहास रचल्याने भारताच्या या मिशन मूनला अधिक महत्त्व आलं आहे. हे मिशन यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. तर, जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानातूनही भारतावर मनापासून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तुम्ही आमच्यापेक्षा खूपच पुढे आहात, अशी कबुलीच पाकिस्तानी नागरिक देताना दिसत आहेत.

भारताने चंद्रावर तिरंगा फडवून संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला आहे. इस्रोच्या मेहनतीवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या यशाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर Congratulations Neighbors चा ट्रेंडही सुरू झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड पाकिस्तानच्या नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सुरू झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांनी सोशल मीडियावरून भारताला शुभेच्छा देताना Congratulations Neighbors असं म्हटलं आहे. तसेच भारताच्या या मेहनतीचं कौतुकही केलं जात आहे.

पाकिस्तानी नागरिक काय म्हणत आहेत?

अभिनंदन शेजाऱ्यांनो (Congratulations Neighbors). तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. यात कोणताही शंका नाही, असं उसबाह मुनेम या पाकिस्तानी यूजर्सने म्हटलं आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये चांद्रयान -3चा फोटोही पोस्ट केला आहे.

तर यासिर खान याने अल्लाह कोणत्याही समाजाची परिस्थिती तोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत तो बदलणार नसेल. अभिनंदन शेजाऱ्यांनो (Congratulations Neighbors). मोठी कामगिरी केलीत, असं म्हटलं आहे.

पाकिस्तानी नागरिक मतभेद विसरून गेले आहेत. अभिनंदन, असं हसीब अहमद यांनी म्हटलं आहे. तसेच एक पाकिस्तानी नागरिक म्हणून मला असं वाटतं की आर्थिकरित्या भारत आपल्या खूप पुढे आहे. त्यामुळे आज भारताचं अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन भारत. Congratulations Neighbors. पाकिस्तानकडून प्रेम, असं आमिर अवान यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी नागरिकांनी भारताला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना प्रत्येक नागरिकाने आपल्या ट्विटमध्ये Congratulations Neighbors हा शब्द वापरला आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर Congratulations Neighbors हा शब्द अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे.

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.