राहुल गांधी दाढी कधी काढणार; काँग्रेस नेत्याने दिले उत्तर…
राहुल गांधी यांनी आपल्या आजीची आठवण सांगितली त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या आजीला मी प्रचंड आवडायचो तर माझी बहीण प्रियांका नानीची आवडती होती.
नवी दिल्लीः काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा नुकताच संपवली आहे. या पदयात्रेची जेवढी चर्चा झाली होती, तेवढीच चर्चा राहुल गांधी यांच्या दाढीचीही झाली होती. त्यांच्या दाढीची जोरदार चर्चा सुरू झाली असली तरी राहुल गांधी यांनी एका मुलाखती आपल्या दाढीचा विषय निघाल्यावर त्यांनी ती दाढी कधी काढणार याचं स्पष्टपणे उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांच्या दाढीच्या प्रश्नाबरोबरच आपल्या आयुष्यातील काही प्रश्नांचीही उत्तरंही त्यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी एका इटालियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते त्यांच्या आजीचे म्हणजेच इंदिरा गांधी यांचे ते प्रचंड आवडीचे होते. आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी त्यांच्या आजी पाओला माइनो यांच्या आवडत्या होत्या.
जेव्हा राहुल गांधी यांना विचारण्यात आले की त्यांनी आतापर्यंत लग्न का केले नाही, तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, हे चित्र खूप विचित्र आहे.
आता लग्न का केले नाही याचे नेमके उत्तर मला सांगता येणार नाही. पण आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत, पण मला मुलांचेही संगोपनही करायचे आहेत असंही त्यांनी सांगितले.
कन्याकुमारी ते काश्मीर या 3,500 किमी लांबीच्या भारत जोडो यात्रेचा अनुभवही राहुल गांधी यांनी सांगताना त्यांनी खूप आठवणी सांगितल्या.
या प्रवासात दाढी वाढवल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी संपूर्ण प्रवासात दाढी न ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण आता मी ठरवेन दाढी ठेवायची की नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधी यांनी आपल्या आजीची आठवण सांगितली त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या आजीला मी प्रचंड आवडायचो तर माझी बहीण प्रियांका नानीची आवडती होती.
माझी आजी 98 वर्षे जगली होती आणि मी तिच्यावर प्रचंड प्रेम केले होते. राहुल गांधी यांच्या आजी पाओला माइनो यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इटलीमध्ये निधन झाले आहे.
राहुल गांधी यांनी लोकशाही संरचना ढासळत असल्याने आणि संसद नीट चालत नसल्याने देशात हुकूमशाही राजवटीची शिरकाव झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांनी फॅसिझमविरोधात भक्कम पर्याय दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पीएम मोदींचा पराभव होऊ शकतो का, या प्रश्नावर ते म्हणाले की, विरोधक एक झाले तर त्यांचा पराभव हा 100 टक्के ठरलेला आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरित होऊ शकते का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही एक कुटुंब आहोत. आमच्याकडे एक कल्पना आहे.
ज्या कल्पनेवर भारताची उभारणी झाली आहे. आमचे एक मिशन ठरलेले आहे. हेच आम्हाला इतर गोष्टींपेक्षा अधिक महत्वाचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
वेळ पडली तर त्यासाठी मी जीवही देऊ शकतो, ज्या प्रमाणे माझ्या आजी आणि वडिलांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे.
माझ्या आईचा जन्म इटलीमध्ये झाला ही फक्त एक कल्पना झाली आहे, आता मात्र माझ्या आईने सगळं आयुष्य भारतासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत देशासाठी आपण आहे याच कल्पनेचं मी समर्थन करेन.