कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, मेडिकल जर्नल लॅन्सेटचा पुराव्यांसह दावा

या दाव्यानुसार कोरोनाचा विषाणू हवेद्वारे पसरत आहे. याबाबतची दहा विविध कारणेही यात देण्यात आली आहेत. (COVID-19 predominantly spreads through air)

कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, मेडिकल जर्नल लॅन्सेटचा पुराव्यांसह दावा
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 10:43 AM

मुंबई : भारतासह जगभरात कोरोनाचा हाहा:कार पाहायाला मिळत आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बहुतांश देशातील परिस्थिती अधिक भीतीदायक बनली आहे. कोरोनाचा प्रसार हा हवेद्वारे होत आहे, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मेडिकल जर्नल Lancet च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची गरज आहे, असे यात म्हटलं आहे. (COVID-19 predominantly spreads through air Lancet study)

हा अहवाल इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ञांनी तयार केला आहे. कोरोना विषाणू हवेत पसरत नाही, हे सिद्ध करण्यासाठी सध्या तरी कोणतेही पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञांचाही यावर विश्वास नाही. त्यामुळे नव्या अहवालानुसार काही तज्ज्ञांनी कोविड 19 च्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये त्वरित बदल करावे, अशी सूचना केली आहे.

जगातील प्रसिद्ध मेडिकल जर्नल द लान्सेटमध्ये कोरोनाबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या दाव्यानुसार कोरोनाचा विषाणू हवेद्वारे पसरत आहे. याबाबतची दहा विविध कारणेही यात देण्यात आली आहेत.

कोरोनाचा हवेद्वारे पसरत असल्याची दहा विविध कारणे

1. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मात्र या रोगाचा प्रसार हा droplets म्हणजेच थेंबापेक्षा हवेद्वारे (aerosol) होणे सोपे आहे. त्यामुळे हा या रोगाचा प्राथमिक वाहक असण्याची शक्यता आहे.

2. विशेषत: क्वारंटाईन करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये राहणारे लोक हे आजूबाजूला असलेल्या खोल्यांमध्ये राहत होते. मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. पण हे सर्व जण कधीही एकमेकांच्या खोल्यांमध्ये गेलेले नव्हते.

3. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, खोकला किंवा शिंका येत नसलेले सर्व कोविड 19 रुग्ण हे 33 टक्क्यांपासून 59 टक्क्यांपर्यंत asymptomatic किंवा prezaptomatic प्रसारासाठी जबाबदार असतात.

4. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा बाहेर (Outdoor) च्या तुलनेत आतील (Indoor) भागात जास्त असतो. कारण आतील भागात ventilation होण्याची शक्यता कमी असते.

5. ज्या रुग्णालयातील डॉक्टरांनी पीपीई किट वापरल्या त्या ठिकाणीही Nosocomial infections सापडले आहे. म्हणजेच पीपीई किट हा संपर्क आणि ड्रॉपलेटपासून सुरक्षित आहे. पण हवेतून प्रसार रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी कोणत्याही मार्ग नाही.

6. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार SARS-CoV-2 हा विषाणू हवेत सापडला आहे. एका लॅबमध्ये SARS-CoV-2 हा विषाणू हवेत कमीतकमी 3 तास संसर्गजन्य स्थितीत होता. तसेच कोरोना रूग्णांच्या रुम आणि कारमधील हवेच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू आढळून आला. (COVID-19 predominantly spreads through air Lancet study)

7. SARS-CoV-2 विषाणू हा रुग्णालयातील एअर फिल्टर्स आणि हॉस्पिटलच्या बिल्डिंग डक्टमध्ये आढळतात. हा विषाणू या ठिकाणी केवळ हवेद्वारे (aerosol) पोहोचू शकतो.

8. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बंद पिंजऱ्यातील प्राण्यांमध्येही कोरोनाचे विषाणू सापडले आहे. जे एअर डक्टच्या माध्यामातून त्या ठिकाणी पोहोचले.

9. कोरोना विषाणू हवेद्वारे पसरत नाही, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

10. respiratory droplets किंवा fomite च्या माध्यामातून कोरोना पसरल्याचे फारसे पुरावे आढळत नाही, असेही त्यांनी या अहवालाच्या शेवटी नमूद केले आहे.

दरम्यान जर या अहवालात करण्यात आलेला दावा खरा ठरला, तर जगभरात मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे आपल्या घराच्या बाहेरच नाही तर घरातही मास्क लावून वावर करावा लागू शकतो. (COVID-19 predominantly spreads through air Lancet study)

संबंधित बातम्या :

Johnson & Johnson Vaccine : भारतात येण्याआधीच अमेरिकेकडून ‘या’ कोरोना लसीवर बंदी, कारण काय?

Prince Philip : इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलीप यांचं 99 व्या वर्षी निधन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.