पाकिस्तानात भ्रष्टाचाराची बजबजपुरी; सीपीईसी प्रकल्प रखडला; चीनची डोकेदुखी वाढली
पाकिस्तानवरचं आर्थिक संकट चीनसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाकच्या आर्थिक संकटामुळे चीनचे अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प बारगळले आहेत. (cpec project between china and pakistan stopped due to corruption)
बीजिंग: पाकिस्तानवरचं आर्थिक संकट चीनसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाकच्या आर्थिक संकटामुळे चीनचे अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प बारगळले आहेत. हे प्रकल्प अर्धवट राहिल्याने त्याच्या खर्चात आणखी वाढ होण्याच्या भीतीने चीनचे धाबे दणादणले आहेत. (cpec project between china and pakistan stopped due to corruption)
‘आशिया टाइम्स’ने अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. चीनने पाकिस्तानला पुरवण्यात येणाऱ्या निधीत कपात केली आहे. चीनच्या सरकारी बँकेने 2016मध्ये पाकिस्तानला 75 बिलियन डॉलरचं कर्ज दिलं होतं. त्यानंतर 2019मध्ये पाकिस्तानला पुन्हा 4 बिलियन डॉलरचं कर्ज देण्यात आलं होतं. त्यानंतरही 2020 मध्ये चीनने पाकिस्तानला केवळ 3 बिलियन डॉलरचं कर्ज दिलं होतं.
अहवालानुसार पाकिस्तानद्वारे सीपीईसीमध्ये अनेक संरचनात्मक कमतरता आढळून आल्या आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळेही चीनच्या काळजीत भर पडली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जी-20 देशांना कर्ज देण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे आपले पैसे बुडतात की काय यामुळे चीन चिंताग्रस्त झाला आहे.
सीपीईसीचं काम थांबलं
2013मध्ये पाकिस्तानात सीपीईसीच्या 122 प्रकल्पांची घोषमा करण्यात आली होती. आता 2020 उजाडलं असून आतापर्यंत केवळ 32 प्रकल्पच पूर्ण झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी युद्ध सुरू असून चीनने वैश्विक ऋण धोरणात बदल केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभारण्याच्याआधीच चीनने काढता पाय घेतला आहे.
पाकिस्तानात सीपीईसीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे, त्याची चिंता चीनला सतावत आहे. 60 अब्ज डॉलरच्या या प्रकल्पाचे चेअरमन आणि पाकिस्तानचे माजी लेफ्टनंट जनरल असीम बाजवा यांनी या काळात 40 मिलियन डॉलरची माया जमा केली आहे. दुसरीकडे चीनच्या अनेक वीज कंपन्यांनी विजेचे दर वाढवून पाकिस्तानला चुना लावला असून सर्व रक्कम स्वत:कडेच ठेवली आहे.
काय आहे सीपीईसी प्रकल्प?
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरअंतर्गत (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन एक हजार 124 मेगावॅटचा प्रकल्प उभारत आहे. भारताने या प्रकल्पाला आधीच विरोध केला आहे. झेलम नदीकिनारी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून पाकिस्तानी ग्राहकांना माफक दरात वर्षाला 5 अब्ज युनिट वीज पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 2.4 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार असून, या भागातील ‘स्वतंत्र ऊर्जा उत्पादना’तील (आयपीपी) ही सर्वांत मोठी गुंतवणूक असल्याचे सूत्रांनी सांगितलं. (cpec project between china and pakistan stopped due to corruption)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 25 December 2020https://t.co/AwLQs7N6jl#Top9News #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
संबंधित बातम्या:
तीन देश, कहाणी एक, आधी गायब, नंतर हत्या, इम्रान खान यांच्या मुस्कटदाबीचा नवा मार्ग
शोएब अख्तरची फेकूगिरी, काश्मीर काबीज करुन भारतावर हल्ला करु, ‘गजवा ए हिंद’चं स्वप्न
(cpec project between china and pakistan stopped due to corruption)