Men VS Wild फेम Bear Grylls याला दिल्ली हायकोर्टाकडून समन्स; काय आहे पूर्ण प्रकरण?
शोमध्ये अनेक नव्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवणारा बेअर ग्रिस सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बेअर ग्रिससह अन्य चार लोकांना दिल्ली हायकोर्टाने समन्स बजावले आहे.
Summons to Bear Grylls : बेअर ग्रिसच्या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या थरारक शोमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील हजेरी लावत अनेक एडव्हेंचर अनुभवले आहेत. शोमध्ये अनेक नव्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवणारा बेअर ग्रिस सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बेअर ग्रिससह अन्य चार लोकांना दिल्ली हायकोर्टाने समन्स बजावले आहे. बेअर ग्रिसला शोच्या कॉपीराईट्सचं उल्लंघन केल्या प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. एका भारतीय स्क्रिप्टरायटरने याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये ‘गेट आउट अलाईव्ह विथ बेअर ग्रिस’ या शोमध्ये कॉपीराइट्सचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं आहे. कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या भारतीय स्क्रिप्टरायटरचं नाव अरमान शंकर शर्मा असं आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अमित बन्सल करत आहेत.
पूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर कोर्टाने बेयर ग्रिससोबत एनबीसी यूनिव्हर्सल इंकचे उपाध्यक्ष टॉम शेली, वॉर्नर ब्रदर्स, नेट जियो इंडिया, हॉटस्टार आणि द वॉल्ट डिज्नी यांना देखील समन्स जारी केला आहे. संबंधित शो गेल्या 10 वर्षांपासून प्रसारित होत असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. यावर कोर्टाने शर्मा यांचे वकील संजीव आनंद यांना विचारलं, ’10 वर्षांनंतर तुम्ही या प्रकरणाला दुजोरा का देत आहात?’
यावर वकील संजीव आनंद म्हणाले, ‘शोचं प्रसारण प्रथम भारतात करण्यात आलं नव्हतं. अशात शोच्या ब्रॉडकास्टवर बंदी करायला हवी. यावर बेयर ग्रिसच्या वकिलांनी देखील आपली बाजू मांडली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे. सध्या याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
स्क्रिप्टरायटर अरमान शंकर शर्मा यांच्या मते, वर्ष 2009 च्या शेवटपर्यंत ‘आखिरी दम तक- टिल द लास्ट ब्रीथ’ शोचा विचार केला होता. जो कॉपीराइट कायद्याअंतर्गत संरक्षित असल्याचं देखील सांगण्यात आलं. ज्यामध्ये 20 लोकांना जंगलात घेऊन जवळपास 8 एपिसोडचा रिऍलिटी शो करण्यात येणार होता. महत्त्वाचं म्हणजे, शो 10 जानेवारी 2011 रोजी कॉपीराइट कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला होता.