ट्रम्प यांचे अजब सरकार, न्यूज एंकर संरक्षणमंत्री, व्हॅक्सीन विरोधी बनणार आरोग्यमंत्री !

डोनाल्ड ट्रम्प येत्या २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यानंतर ते आपली ड्रीम योजना म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या अनधिकृत नागरिकांना अमेरिकेतून हुसकावून टाकणार आहेत. याआधी पेंटागन येथील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत असे म्हटले जात आहेत.

ट्रम्प यांचे अजब सरकार, न्यूज एंकर संरक्षणमंत्री, व्हॅक्सीन विरोधी बनणार आरोग्यमंत्री !
मॅट गॅट्ज,जुडी लिंडा आणि पीट हेगसेथ
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 5:00 PM

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज होत आहेत. ते येत्या २० जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी आपले कॅबिनेट सदस्य निवडले आहे. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील एक-एक सदस्यांचे नाव ऐकून वाद निर्माण झालेला आहे. WWE चे संस्थापक विन्स मॅकमोहन ( Vince Mcmahon ) यांची पत्नी लिंडा यांना ट्रम्प यांनी नवे शिक्षण मंत्री म्हणून नेमले आहे. विन्स मॅकमोहन ट्रम्प यांचे जवळचे मित्र आहेत. ट्रम्प २००२ ते २०१० दरम्यान अनेक वेळा WWE च्या या नकली कुस्ती खेळाच्या स्पर्धांना दिसले आहेत.

लिंडा या देखील WWE च्या सहसंस्थापक आहेत. रेसलिंग एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीशी संबंधित जुडी लिंडा यांना अमेरिकेचे शिक्षण मंत्री केल्याने ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे.या यादीत दुसरे नाव नवी एटर्नी जर्नल बनणाऱ्या मॅट गॅट्ज यांचे आहे. एटर्नी जर्नल सारख्या महत्वाच्या पदावर मॅट यांची निवड झाल्यानेही गोंधळ उडाला आहे. साल २०१७मध्ये कॅलिफोर्निया पोलिसांनी मॅट यांची लैंगिक शोषण प्रकरणात चौकशी केली होती. एका सतरा वर्षीय मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्या पैसे मोजून शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोपही आहेत. लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला देशाचे अटर्नी जर्नल कसे काय केले जात आहे असा वाद निर्माण झाला आहे.

न्यूज एंकर बनला संरक्षण मंत्री

पीट हेगसेथ यांना ट्रम्प सरकारमध्ये संरक्षण मंत्री केलेले आहे. फॉक्स न्यूज चॅनलमध्ये पीट हेगसेथ न्यूज अॅंकर आहे. संरक्षण मंत्री पदासाठी त्यांचा अनुभव पुरेसा नसल्याचे म्हटले जात आहे. युद्धग्रस्त जागतिक संकटाच्या काळात अनेक लायक व्यक्ती असताना त्यांना संरक्षण मंत्री केल्याने टीका होत आहे.ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट सारख्या धोरणाचे पीट हेगसेथ समर्थक असल्याने ट्रम्प यांच्या योजना पुढे रेटण्यासाठी त्यांना हे पद दिल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॅक्सीन विरोधी बनला आरोग्यमंत्री

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या भाचे रॉबर्ट एफ.केनेडी ज्युनिअर देशाचे आरोग्यमंत्री होणार आहेत. एंटी व्हॅक्सीन कार्यकर्ता असलेल्या केनेडी ज्युनिअर यांना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाचा प्रमुख केले होते. केनेडी यांना जगभर व्हॅक्सीनचा कट्टर विरोधक मानले जाते. ट्रम्प यांनी अशा व्यक्तीला आरोग्य विभाग दिला आहे ज्याचे विचार लोकांच्या आरोग्याच्या विरुद्ध आहेत अशी टीका होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.