उत्तर कोरियात लोकांवर उपासमारीची वेळ, किम जोंग यांनी सांगितलं ‘हे’ कारण

उत्तर कोरियाच्या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आलीय. आधीच अण्वस्त्र चाचण्यामुळे जागतिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय.

उत्तर कोरियात लोकांवर उपासमारीची वेळ, किम जोंग यांनी सांगितलं 'हे' कारण
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 8:03 PM

सियोल : हुकुमशाहीसाठी आणि अण्वस्त्र तयार करण्यातील आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. उत्तर कोरियाच्या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आलीय. आधीच अण्वस्त्र चाचण्यामुळे जागतिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. त्यातच आता अन्नधान्याच्या तुटवड्यानं त्यांचं कंबरडं मोडलंय. विशेष म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीपासून उत्तर कोरियाने त्यांच्याकडे कोणताही संसर्ग आला नसल्याचा दावा केला. जागतिक आरोग्य संघटनेलाही कोरोनाची कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही (Economic condition of North Korea worsening due to Covid 19 and other reason).

अधिकाऱ्यांना दोषी ठरवत कठोर कारवाई

आर्थिक परिस्थिती बिघडल्यानं आणि लोकांवर उपासमारीची वेळ आली. त्यानंतर उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंगने याला काही लोकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं म्हटलंय. उत्तर कोरियातील या परिस्थितीला किम जोंगने आपल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील केलीय. किम जोंगने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय, तर काही अधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवलाय.

उत्तर कोरियाने कोरोनाची आकडेवारी लपवल्याचा आरोप

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियात कोरोना संसर्ग असल्याचा आरोप केलाय. मात्र, उत्तर कोरियानं हा आरोप फेटाळलाय. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने उत्तर कोरियात कोरोना संसर्ग असल्याचं म्हटलंय. त्यातच अण्वस्त्र चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचाही फटका उत्तर कोरियाला बसलाय. याशिवाय चीनच्या सीमेवरही कठोर निर्बंध लावण्यात आलेत. त्यामुळे उत्तर कोरियाचा व्यापरही ठप्प झालाय. अशी सगळी परिस्थिती असताना नैसर्गिक संकटांमुळे यंदा उत्तर कोरियातील पिकंही नष्ट झालीत. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. याचाच परिणाम म्हणून येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीय.

उत्तर कोरियाला कोरोना विरोधी लस मिळण्यातही अडचण

उत्तर कोरियाला मे अखेर एस्ट्रोजेनेका पीएलसीचे 1.7 मिलियन (17 लाख) डोस मिळणार होते. मात्र नियमांचं पालन न केल्यानं हे लसीचे डोस मिळण्यातही अनेक अडचणी येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही लसींचा पुरवठा होऊ शकला असता मात्र त्यातही उत्तर कोरियाच्या भूमिकेमुळे अडथळे आले.

हेही वाचा :

Kim Jong Un Video | चर्चा तर होणारच! हुकुमशहा किम जोंग उनचे वजन घटले, जगभरात तर्क-वितर्कांना उधाण

भावापेक्षा बहिण डेंजर, किम जोंगच्या बहिणीची अधिकाऱ्यांना जबर शिक्षा

Report on Nuclear Bomb : पाकिस्तानकडे भारतापेक्षाही जास्त अणुबॉम्ब, कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र?

व्हिडीओ पाहा :

Economic condition of North Korea worsening due to Covid 19 and other reason

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.