AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या 6 महिन्यात 4,51,000 लोकांचा मृत्यू? अल निनोबाबत वैज्ञानिकांची भयंकर भविष्यवाणी; भारतही नाही वाचणार?

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात विकसित होणारा अल निनो येत्या 6 महिन्यात 4.5 लाख लोकांचा जीव घेऊ शकतो, असा इशारा दिला आहे. भीषण उष्णता आणि हवामानातील बदलांमुळे भारतसह अनेक देशांवर दुष्काळ, पूर आणि कृषी उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार, ही एक मोठी जागतिक आपत्ती ठरू शकते.

येत्या 6 महिन्यात 4,51,000 लोकांचा मृत्यू? अल निनोबाबत वैज्ञानिकांची भयंकर भविष्यवाणी; भारतही नाही वाचणार?
weatherImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 4:49 PM
Share

अल निनोबाबत हवामान शास्त्रज्ञांचा एक निष्कर्ष समोर आला असून त्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. प्रशांत महासागरात विकसित होत असलेला अत्यंत सशक्त अल निनो येत्या सहा महिन्यात महाभयंकर रुप धारण करणार आहे. त्याममुळे जगाच्या तोंडचं पाणी पळणार असल्याचा दावा या हवामान शास्त्रज्ञांनी केला आहे. अल निनोमुळे भीषण उकाडा वाढवणार आहे. या अतिरिक्त उकाड्यामुळे 4.5 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो, असा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे. शिकागो विद्यापाठीचाच्या क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

या रिपोर्टनुसार, अतिरिक्त उकाडा पडणार असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यूचा आकडा वाढणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्या भागात अल निनोमुळे अतिरिक्त उकाडा वाढणार आहे, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून उपाययोजना करणे, कष्टकऱ्यांसाठी खास उपयायोजना करण्याचे उपायही सूचवण्यात आले आहेत.

साडेचार लाख लोकांना फटका

हवामान शास्त्रज्ञांनी ही घटना असामान्य असल्याचं म्हटलं आहे. वैज्ञानिकांच्या मते, प्रशांत महासागरात काही क्षेत्रांमध्ये समुद्राच्या सपाटीचं तापमान सामान्य ते अधिक झालं आहे. या अतिरिक्त उकाड्याचा परिणाम वैश्विक वातावरणावर पडत आहे. शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक आणि क्लायमेट इम्पॅक्ट लॅबचे सह संस्थापक आणि या रिपोर्टचे रायटर मायकल ग्रीनस्टोन म्हणाले की, या अतिरिक्त उकाड्यामुळे 4,51,000 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यावरून ही आपत्ती किती मोठी आहे हे समजू शकतो. या मृतांमध्ये आईवडील, मुलं, बुजुर्ग, शेजारी आणि दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या लोकांचा समावेश असणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

अल निनो ही एक नैसर्गिक हवामानाशी संबंधित घटना आहे. प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्वेकडील समुद्रातील सपाटीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक झाल्यावर अल निनोचा धोका होतो. त्यामुळे जगातील विविध भागात पाऊस, तापमान आणि हवामानाचा सामान्य पॅटर्न बदलतो. मानवीय हस्तक्षेपामुळे आधीच वैश्विक तापमान वाढलेलं असतानाच अल निनोचा धोका उभा ठाकला आहे. या अतिरिक्त उष्णतेमुळे अल निनोशी संबंधित परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. अल निनोमुळे काही क्षेत्रांमद्ये अत्याधिक उकाडा वाढणार असून दुष्काळाचा धोका उद्भवणार आहे. तर काही भागात भयंकर पाऊस पडून महापूर आणि वादळ येण्याची शक्यता आहे.

भारतावरही संकट

वैज्ञानिकांच्या मते, अल निनोचा थेट परिणाम इंडोनेशिया, भारत आणि नायजेरियापासून अमेरिकेपर्यंत जाणवणार आहे. त्याशिवाय दुष्काळ, जंगलांना आग लागणे आदी घटना वाढणार असून त्यामुळे मोठी जीवित हानी होणार आहे. याचा परिणाम कृषी उत्पादन, खाद्य सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेवरही पडणार आहे. अतिरिक्त उकाड्याने जे मृत्यू वाढणार आहेत. त्याची निश्चित भविष्यवाणी करता येणार नाही, मात्र, संभावित धोक्याचा हा निष्कर्ष आहे. या अंदाजामुळे सरकार आणि स्थानिक प्रशासनाला तयारी करणं सोपं जाणार आहे. दरम्यान, अल निनोचा प्रभाव पूर्णपणे रोखणं अशक्य असल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी