आपल्याकडे एक डोसची मारामार, युरोपियन कमिशनकडून 100 कोटीपेक्षा जास्त लशींची बुकींग
भारत सध्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याला सामोरा जात आहे. BioNtech and Pfizer vaccine supply
नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याला सामोरा जात आहे. भारतातील लस उत्पादक कंपन्यांसमोर उत्पादन वाढीचं आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे भारतात हे चित्र असताना दुसरीकडे युरोपमध्ये युरोपियन कमिशनने जगातील दोन प्रमुख लस उत्पादक कंपन्यांसोबत करार केला आहे. या कराराद्वरे युरोपियन कमिशनच्या सदस्य देशांसाठी एक अब्ज 80 कोटी डोसचं बुकिंग करण्यात आलं आहे. कोरोना लसींसाठी युरोपियन कमिशननं हा करार बायोएनटेक आणि फायझर यां कंपन्यांसोबत केला आहे. (European Commission sign contract with BioNtech and Pfizer for 1.8 Billion vaccine supply)
युरोपियन यूनियनच्या सदस्य देशासांठी लसींचं बुकिंग
युरोपियन यूनियनच्या सदस्य देशांसाठी कोरोना लसींच्या 1 अब्ज 80 कोटी डोसंचं बुकिंग केल्याची माहिती आहे. या करारानुसार बायोएनटेक आणि फायझर या दोन्ही कंपन्या युरोपियन यूनियनमधील सदस्य देशांना कोरोना लसींचा पुरवठा करतील. हा पुरवठा दोन्ही कंपन्यांना 2021 ते 2023 दरम्यान करायचा आहे.
European Commission signs third contract with BioNTech-Pfizer for 1.8 bln vaccine doses https://t.co/3d43qcIO3d pic.twitter.com/6zZKXpJveC
— Reuters (@Reuters) May 20, 2021
दोन्ही कंपन्यांना लसीचं उत्पादन युरोपियन यूनियनच्या सदस्य देशांमध्येच करणं अनिवार्य
युरोपियन कमिशन आणि बायोएनटेक आणि फायझर या कंपन्यांमध्ये कोरोना लसीचं उत्पादन कुठे करायचं या विषयी देखील करारामध्ये ठळकपणे नमूद करण्यात आलं आहे. करारानुसार दोन्ही कंपन्यांना कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन युरोपियन यूनियनच्या सदस्य देशांमध्ये करावं लागणार आहे. त्याशिवाय महत्वाची बाब म्हणजे युरोपियन यूनियनमधील सदस्य देशांमधूनच कच्च्या मालाची आयात करावी, अशी अट देखील या करारामध्ये घालण्यात आली आहे. या विषयीचं वृत्त रीट्रस या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
युरोपियन कमिशन नेमकं काय?
युरोपियन यूनियन ची कार्यकारी शाखा म्हणून युरोपियन कमिशन काम करतं. या कमिशनकडे कायदे बनवणे, त्याची अंमलबजावणी करणे. युरोपियन देशांच्या कराराबद्दलचं काम पाहणे. युरोपियन यूनियनचं दैनंदिन कामकाज पाहणे हे कामं असतं. युरोपियन कमिशनच्या कमिशनरची निवड युरोपियन युनियनची परिषद करते. यामध्ये एकूण 27 सदस्य काम करतात.
युरोपियन यूनियनमध्ये किती देशांचा सहभाग
युरोपियन यूनियनमध्ये युरोप खंडातील 27 देशांचा सहभाग आहे. या सर्व देशांची एकत्रित लोकसंख्या 447 दशलक्ष इतकी आहे. युरोपियन यूनियनमधून काही वर्षांपूर्वीचं ब्रिटन बाहेर पडला होता. युरोपियन यूनियनमधील सदस्य देशांनी त्यांची एक बाजारपेठ तयार केलेली आहे. त्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. युरोपियन यूनियनमध्ये फिनलँड, स्वीडन, आयर्लंड, डेन्मार्क, इस्टोरिया, पोलंड, नेदरलँड, जर्मनी, झेक रिपब्लिक, बेल्जियम, ऑस्ट्रिया, रोमानिया, बल्गेरिया, ग्रीस, सायप्रस, माल्टा, इटली, हंगेरी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, अशा एकूण 27 देशांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी गेले कुठे? राज्यांवर लसींचा बोजा का?
(European Commission sign contract with BioNtech and Pfizer for 1.8 Billion vaccine supply)