Fact Check VIDEO | युद्धात अर्धमेल्या बाईच्या पोटी पुतीनचा जन्म? अंगावर काटा आणणाऱ्या व्हायरल स्टोरीचं सत्य काय?

2014 मध्ये एका कॅनेडियन टेलिव्हिजन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हिलरी क्लिंटन यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती. ही कथा क्लिंटन यांच्या हार्ड चॉइसेस या पुस्तकातही छापण्यात आली आहे.

Fact Check VIDEO | युद्धात अर्धमेल्या बाईच्या पोटी पुतीनचा जन्म? अंगावर काटा आणणाऱ्या व्हायरल स्टोरीचं सत्य काय?
पुतिन यांच्या आईविषयीची कथा हिलरी क्लिंटन यांनी सांगितली होती
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:45 AM

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) युद्धाची ठिणगी पेटल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याविषयी अनेक सुरसकथा ऐकायला मिळत आहेत. गुप्तचर यंत्रणेतील धूर्त अधिकारी ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास, इथपासून त्यांचं पूर्वायुष्य, लग्न, पत्नी, मुलं आणि संपत्ती इथपर्यंत बरंच काही. थँक्स टू व्हॉट्सअॅप. मात्र या सामर्थ्यवान राजकारण्याचा जन्म कुठे झाला, त्याचं बालपण कसं गेलं, याविषयी फारसं वाचायला मिळत नाही. अमेरिकन राजकीय नेत्या हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) यांनी आठ वर्षांपूर्वी पुतिन यांच्या जन्मापूर्वीची कथा एका जाहीर मुलाखतीत सांगितली होती. व्लादिमीर पुतिन ट्रेण्डिंगमध्ये येताच क्लिंटन यांची ही मुलाखतही पुन्हा युट्यूबवर पाहिली जात आहे. एका डिनर सोहळ्यात खुद्द पुतिन यांनी हिलरी क्लिंटन यांना त्यांच्या आईविषयीची कथा सांगितली होती. पुतिन यांच्या अर्धमेल्या आईला मृत समजून सामूहिक कबरीत दफन केले जात होते. मात्र त्यांच्या वडिलांनीच प्रसंगावधान राखल्याने व्लादिमीर यांच्या आईचे प्राण वाचले आणि त्यानंतर आठ वर्षांनी तिच्याच पोटी या बलाढ्य नेत्याने जन्म घेतला.

2014 मध्ये एका कॅनेडियन टेलिव्हिजन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हिलरी क्लिंटन यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती. ही कथा क्लिंटन यांच्या हार्ड चॉइसेस या पुस्तकातही छापण्यात आली आहे. खुद्द पुतिन यांनीच एका डिनर सोहळ्यात हिलरी क्लिंटन यांना हा किस्सा सांगितला होता.

काय आहे ही कथा?

1944 मधली ही गोष्ट. दुसऱ्या महायुद्धानंतर एक रशियन सैनिक घरी आला. त्याच्या घराबाहेर काही मृतदेहांचा खच पडला होता. गाडीतून नेऊन ते पुरण्यासाठी एक माणूस वाट बघत होता. इतक्यात त्या जवानाचं लक्ष एका मृतदेहाच्या पायातल्या बूटांकडे गेलं. ते त्याला ओळखीचं वाटलं. नीट पाहतो तर काय, ते त्याच्या बायकोचं होतं.

…आणि ती जिवंत झाली

जवानाने विनंती करुन तिचं पार्थिव ताब्यात घेतलं. तिला घट्ट बिलगल्यावर त्याला जाणवलं की बायकोने प्राण सोडलेले नाहीत. तो तिला घरी घेऊन आला. तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. यानंतर आठ वर्षांनी म्हणजे 1952 मध्ये तिच्या पोटी मूल जन्माला आले. ते म्हणजे व्लादिमिर पुतिन.

कथेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह

या कथेच्या सत्यतेवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुतिन यांनी ठामपणे ही कथा पटवून दिली होती, तरी ती शंभर टक्के खरी आहे की नाही, हे खात्रीलायक माहिती नसल्याचं क्लिंटन स्वतः म्हणाल्या होत्या.

हिलरी क्लिंटन यांनी मुलाखतीत सांगितलेल्या कथेचा व्हिडीओ पाहा

संबंधित बातम्या :

शरणागतीशिवाय चर्चा नाही, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनचा प्रस्ताव फेटाळला!

Ukraine सरेंडक करणार…की Vladimir Putin गेम ओव्हर करणार?

 यूक्रेनमध्ये सत्तापालट? सत्ता तुमच्या हातात घ्या, ब्लादिमीर पुतिन यांचं यूक्रेनच्या सैन्याला आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.