Fauda | प्रसिद्ध वेब सीरीजमधला हिरो, खऱ्याखुऱ्या युद्धात इस्रायलकडून लढण्यासाठी पोहोचला सीमेवर
Fauda | इस्रायलमध्ये नागरीकांना लष्करी प्रशिक्षण सक्तीच असतं. कारण या देशाला अनेकदा अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्याव लागतं. आज स्वत: हिरोच इस्रायलकडून लढण्यासाठी रणांगणात उतरलाय.
जेरुसलेम : इस्रायलवर शनिवारी इतिहासातील सर्वात भीषण हल्ला झाला. हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलमध्ये घुसून मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्य़ा. जवळपास 1200 निरपराध इस्रायली नागरीक आणि सैनिकांयी या हल्ल्यात आपले प्राण गमावले. या घटनेनंतर इस्रायलने हमास विरोधात युद्धा पुकारले आहे. शनिवारपासून इस्रायली एअर फोर्सकडून गाझा पट्टीत बॉम्बफेक सुरु आहे. इस्रायलने जवळपास 3 लाख सैन्याची जमवाजमव केली आहे. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसू शकते. इस्रायली सैन्याकडून गाझा पट्टी सोडून जाण्यास पॅलेस्टिनी नागरिकांना सांगण्यात आलं आहे. इस्रायल या युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असून फक्त त्यांचं सैन्यच नाही, तर नागरीकही या युद्धात उतरणार आहेत. इस्रायलमध्ये नागरीकांना लष्करी प्रशिक्षण सक्तीच असतं. कारण या देशाला अनेकदा अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्याव लागतं. इस्रायलने एकाचवेळी अनेक देशांशी युद्ध लढल्याची इतिहासात अनेक उद्हारण आहेत.
इस्रायलमध्ये फक्त सैन्यच नाही, तर त्या देशातील नागरिक, सेलिब्रिटी सगळेच रणांगणात उतरले आहेत. ‘फौदा’ या वर्ल्ड फेमस वेब सीरीजमधील हिरो इदान अमेदी सुद्धा इस्रायली डिफेन्स फोर्सेसमध्ये दाखल झाला आहे. फौदा वेब सीरीजमध्ये इदान अमेदीने सागीची भूमिका केली होती. इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या स्पेशल ऑपरेशन्स टीममधला नायक त्याने रंगवला होता. वेब सीरीजमधला हा हिरो आता खऱ्या युद्धात उतरला आहे. इदान अमेदीने एक भावनिक व्हिडिओ मेसेज पोस्ट केला आहे. इस्रायली सैन्याला जॉईन करण्याबद्दल तो बोललाय. ‘ब्रदर्स इन आर्म्स’ या स्वयंसेवकाच्या ग्रुपला त्याने ज़ॉइंन केलय. ‘फौदा’ मधील आणखी एक हिरो लायर राझ नंतर आता इदान अमेदी देशाच्या सैन्याला मदत करण्यासाठी पोहोचलाय.
‘हा फौदा मधला सीन नाहीय’
“आज तुम्ही मला दुसऱ्या पोशाखात पाहताय. हा फौदा मधला सीन नाहीय” हे खर आयुष्य आहे असं इदान म्हणालाय. सैनिकाच्या गणवेशात असलेल्या इदानच्या हाती बंदुक आहे. “आमच्या मित्रांची, प्रियजनांची हत्या करण्यात आली. पण आमचा आत्मविश्वास तूसभरही कमी झालेला नाही” असं इदान अमेदी म्हणालाय. “आम्ही इथे का आहोत? हे आम्हाला माहितीय. आमची मुलं, कुटुंब आणि घराच्या संरक्षणासाठी आम्ही इथे आहोत. आम्ही जिंकणार, शरणागती पत्करणार नाही” असं इदान अमेदीने सांगितलं. ‘आय लव्ह यू’
फ्रंट लाइनवर लढणाऱ्या सैनिकांसाठी इस्रायली जनतेने काही वस्तू पॅकेजच्या रुपाने पाठवल्यात त्याबद्दल अमेदीने त्याचे आभार मानलेत. “दररोज लाखो वस्तू आम्हाला पाठवल्या जात आहे. त्यात हाताने लिहिलेली सुंदर पत्र, चित्र आहेत. याने आम्हाला बळ मिळतं. आय लव्ह यू” असं इदान अमेदीने म्हटलय.