AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवळलेल्या समुद्रात 243 प्रवाशांचे जहाज अचानक गायब,अनेक प्रवासी बेपत्ता, अपघात कसा घडला

इंडोनेशिया के जावा सागर में खराब मौसम के बीच 243 यात्रियों वाली फेरी लापता हो गई. हादसे में 6 लोगों की मौत हुई, 97 को बचाया गया. बाकी यात्रियों की तलाश जारी है.

खवळलेल्या समुद्रात  243 प्रवाशांचे जहाज अचानक गायब,अनेक प्रवासी बेपत्ता, अपघात कसा घडला
Ferry sinks in Java Sea
| Updated on: Sep 13, 2026 | 8:01 PM
Share

इंडोनेशियाच्या जावा समुद्रात हवामान खराब झाले असताना एक फेरी बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून 97 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरु आहे. ही फेरी बोटी Virgo Transport 8 नावाची होती. त्यात एकूण 243 प्रवासी बसले होते. फेरी बोट शनिवारी सकाळी 10:33 वाजता सुराबाया हून दक्षिण कालीमंतनच्या बंजारमासिकसाठी रवाना झाली होती. या फेटी बोटीला रविवारी दुपारी 2 वाजता बंजारमासिन पोहचायचे होते.

रविवारी रात्री सुमारे 2 वाजता जहाजाशी संपर्क तुटल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी फेरी बंजारमासिनहून सुमारे 150 किलोमीटर दक्षिणेकडे होती. अधिकाऱ्यांनी जहाजाची ऑपरेटर कंपनी PT Virgo ने सकाळी 4:10 वाजता पहिल्यांदा मदतीची सूचना मिळाली. खराब हवामानामुले ही फेरी बोट संकटात सापडली होती,

जहाज आणि हेलिकॉप्टरातून रेस्क्यू

या अपघातानंतर इंडोनेशियाच्या सर्च एंड रेस्क्यू एजन्सी, नौदल, मरिन पोलिस आणि इतर एजन्सीनी मिळून बचाव मोहीम सुरु केली होती. घटना स्थळावर अनेक जहाजे आणि एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. जावा समुद्राच्या आसपास उपस्थित अन्य जहाजांना देखील प्रवाशांच्या शोधासाठी मदतीत आणण्यात आले होते. प्रवासी दिसल्यास लागलीच माहिती देण्याचे सांगण्यात आले होते. अपघाताची आणि रेस्क्यू मोहिमची माहिती देण्यासाठी रविवारी सकाळी त्रिसक्ती पोर्ट भागात एक ऑपरेशन सेंटर स्थापन करण्यात आले होते.

बंजरमासिन येथील रहिवासी असलेल्या रुस्मिलावती या त्यांच्या 8 नातेवाईकांच्या ठावठिकाण्याबद्दल चौकशी करण्यासाठी बंदरावर गेल्या. जावामधील अनेक इस्लामिक विद्वानांच्या थडग्यांना भेट देऊन हे पर्यटक जहाजाने बंजरमासिनला परत येत होते. कुटुंबाला शेवटचा एक व्हॉट्सॲप स्टेटस एका नातेवाईकाकडून मिळाले . ज्यात त्याने समुद्राच्या प्रचंड लाटांबद्दल भीती व्यक्त केली होती. रविवार दुपारपर्यंत, कुटुंबाना त्यांच्या नातेवाईकांबद्दल कोणतीही बातमी मिळालेली नव्हती.

इंडोनेशियामध्ये १७,००० हून अधिक बेटे

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एका फेरी बोटीला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियामध्ये १७,००० हून अधिक बेटे आहेत आणि फेरी बोटी हे येथील जल वाहतूकीचे एक प्रमुख साधन आहे.

Follow Us
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?