FIFA : पराभव जिव्हारी लागलेल्या मोरक्को फॅन्सचा धुडगूस! जाळपोळ, तोडफोड, तुफान तांडव
FIFA वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये फ्रान्सकडून पराभूत झाल्यानंतर मोरक्को फॅन्स बिथरले! पाहा व्हिडीओ..
कतार : फिफा वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमध्ये मोरक्को आणि फ्रान्स यांच्यात लढत झाली. हा सामना फ्रान्सने 2-0च्या फरकाने जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. पण मोरक्कोच्या चाहत्यांना हा परभाव चांगलाच जिव्हारी लागला. इतका ही त्यांनी कतारच्या रस्त्यावर जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तोडफोड, राडा आणि नुसतं तांडव कतार मधील शहरात पाहायला मिळालं. मोरक्कोच्या फुटबॉल टीमला सपोर्ट करायला आलेल्या चाहत्यांनी पराभवानंतर केलेल्या कृतीनं कतारमध्ये खळबळ माजली. रातोरात रस्त्यावर दंगलीसारखी परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे प्रचंड तणावही निर्माण झाला होता. अखेर कतारमधील पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
एकीकडे फ्रान्सच्या चाहत्यांचा जल्लोष तर दुसरीकडे कतारच्या चाहत्यांचा धुडकूस, असं चित्र सेमीफायनल नंतर पाहायला मिळालं. मोरक्कोचे फॅन्स मॅच संपल्यानंतर कतारच्या रस्त्यावर उतरले. निदर्शनं करु लागले. या निदर्शनाला हिंसक वळणही लागलं. अखेर पोलिसांना अश्रूधुराचा वापर करत, पाण्याचे फवारे मारुन चाहत्यांना आवर घालण्याची वेळ ओढावली होती.
फायनलमध्ये जाण्याचं मोरक्कोचं स्वप्न फ्रान्सच्या कमाल खेळीमुळे भंगलं होतं. पण हा पराभव मोरक्कोच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या चाहत्यांना पचवता आला नाही. त्यांनी कतारमध्ये तोडफोड, जाळपोळ करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. यात प्रचंड नुकसानही झालं.
पाहा व्हिडीओ :
Mass riots broke out in #France
Moroccan fans, upset by the defeat of their national team, began to destroy everything in their path. The police are forced to use special means.
In Montpellier, the fans tried to rip the French flag from the car. The result is in the last video. pic.twitter.com/aE1ZH45S5m
— NEXTA (@nexta_tv) December 15, 2022
अखेर कतारमधील पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्या मोरक्कोच्या काही चाहत्यांना अटकही केली. तर काहींना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी शांततेचं आवाहन मोरक्को फॅन्सला केलं होतं. पण पोलिसांवरही या फॅन्सकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही काही व्हिडीओ व्हायरल झालेत.
जिथे जिथे मोरक्को खेळले, तिथे तिथे राडा
दरम्यान, याआधी मोरक्कोटी फुटबॉल टीम वर्ल्ड कपमध्ये जिथे जिथे खेळली, तिथे तिथे राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.
Morocco won against Spain, Riots in Spain.
Morocco won against Portugal, Riots in Portugal.
Morocco lost to France, Now Riots in France.
So Sports has no religion!
And what we are witnessing, is not a clash of civilizations….what is ? pic.twitter.com/xQERaHoMNd
— Prashant Umrao (@ippatel) December 15, 2022
फ्रान्सच्या पॅरिसमध्येही मोरक्कोमधील फुटबॉल प्रेमींनी मोठा राडा केला होता. फ्रान्सच्या विजयानंतर रस्त्यावर उतरुन जल्लोष करणाऱ्या फॅन्सवर मोरक्कोला सपोर्ट करणाऱ्यांनी अडकवणूक करत झटापट झाली होती. यावेळी मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. यावेळी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ ओढावली होती. आता पुन्हा एकदा मोरक्कोच्या फॅन्सची राडा केल्याचं पाहायला मिळालंय.