प्रेसिडेंट मेडल विनर ते ऑपरेशनल कमांडर, कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा, इंडियन नेव्हीचे ‘ते’ 8 माजी अधिकारी कोण?
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही बातमी म्हणजे भारतासाठी एक मोठा धक्का आहे. या विषयाचा इस्रायलशी संबंध आहे. सध्याच्या परिस्थितीत कतार हमासच्या बाजूने उभा आहे आणि भारत इस्रायलच्या. भारतीय नौदलात काम करताना या अधिकाऱ्यांचा रेकॉर्ड खूप शानदार होता.
दोहा : कतारमध्ये इंडियन नेव्हीच्या 8 माजी अधिकाऱ्यांना तिथल्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. भारतासाठी हा एक झटका आहे. कतारने भारतीय नौदलाच्या या माजी अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलाय. या माजी नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी कथित हेरगिरी करत असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या अधिकाऱ्यांवर कतारच्या सबमरीन प्रोजेक्टशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप करण्यात आलाय. कतारची वेबसाइट अल-जजीराने ही माहिती दिलीय. या अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आश्चर्य व्यक्त केलय. भारत सरकार या सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याबद्दल विचार करतेय. विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन भारत सरकारने या प्रकरणाबद्दल जास्त खुलासा केलेला नाहीय.
भारताच्या ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने शिक्षा सुनावलीय, भारतातील त्यांचा सर्विस रेकॉर्ड खूप शानदार आहे. त्यांच्यावर कधीही, कुठला ठपका नव्हता. व्यावसायिक सतर्कता, वेगवान कामकाज आणि शार्प माइंडमुळे यांच्यातील एका अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. एक अधिकारी तामिळनाडू येथील डिफेंस सर्विसेज स्टाफ कॉलेज वेलिंगटनमध्ये आपल्या सेवाकाळात इंस्ट्रक्टर होते. एक दुसरा अधिकारी आपल्या सेवाकाळात भारतीय युद्धनौका आयएनएस विराटवर फायटर कंट्रोल आणि नेविगेटिंग ऑफिसरच्या रोलमध्ये होता.
हे अधिकारी कतारला कसे गेल?
नौदलाच्या ज्या माजी अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने हेरगिरीच्या आरोपात शिक्षा सुनावलीय ते कोण आहेत? कतारला कसे गेले? हे जाणून घेणं आवश्यक आहे. भारतीय नौदलातील सेवाकाळात या अधिकाऱ्यांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांनी 20 वर्ष काम केलय. महत्वपूर्ण पद भूषवली. त्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात कतारची प्रायव्हेट कंपनी अल दहारा ( Al Dahra) सोबत काम सुरु केलं. अल दहारा कंपनीत हे अधिकारी मागच्या काही वर्षांपासून कतारच्या नौदल अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते. कुठले अधिकारी आहेत?
कॅप्टन नवतेज सिंह गिल
कॅप्टन सौरव वशिष्ठ
कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा
कमांडर पूर्णेंदू तिवारी
कमांडर सुगुनकर पाकला
कमांडर संजीव गुप्ता
कमांडर अमित नागपाल
नाविक रागेश