Shinzo Abe News: जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या! गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिंजो आबे यांचं निधन
Shinzo Abe Japan : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन
जपान : एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरातून मोठी बातमी समोर आली आहे. जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Former Prime Minister Shinzo Abe Passed Away) यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार (Attack on Shinjo Abe) करण्यात आला. यात ते जखमी झाले. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात गोळीबार झाला. एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे. शिंजो आबे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावरही झाला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक तपास सुरु आहे. शिंजो आबे हे गोळीबारानंतर बेशुद्ध झाले पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
शिंजो आबे यांचं निधन
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते जखमी झाल्याची माहिती आहे. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात गोळीबार झाला. एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे. शिंजो आबे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावरही झाला. त्यांची प्रकृती सध्या नाजूक होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
Officials say former Japanese Prime Minister #ShinzoAbe has been confirmed dead. He was reportedly shot during a speech on Friday in the city of Nara, near Kyoto: Japan’s NHK WORLD News pic.twitter.com/7ayJpNCw17
— ANI (@ANI) July 8, 2022
एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं. त्यानंतर देशात उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आबे यांना आदरांजली अर्पण केली आहे. माझ्या प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांचं निधन झालं. त्याचं मला अतिव दुख: झालं. अलीकडंच आमची भेट झाली. या भेटीदरम्यानचा हा फोटो आहे. भारत-जपान संबंध दृढ करण्यासाठी ते नेहमीच कार्यरत होते. त्यांनी नुकतंच जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं. शिंजो हे वैश्विक राजकिय नेते होते. जवळच्या मित्राच्या मृत्यूच्या बातमीने मी दुःखी झालो आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींचं ट्विट
Sharing a picture from my most recent meeting with my dear friend, Shinzo Abe in Tokyo. Always passionate about strengthening India-Japan ties, he had just taken over as the Chairman of the Japan-India Association. pic.twitter.com/Mw2nR1bIGz
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
शिंजो आबे कोण आहेत?
शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान होते. जपानच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं. 2006 ते 2007 यानंतर 2012 ते 2020 असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधानपदी होते. शिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 साली झाली. जपानच्या लिबरल डेमोक्रेटीक पार्टीचे म्हणजेच एलडीपीचे ते अध्यक्ष आहेत. शिंजो आबे हे आता 71 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म टोकीयोमध्ये एका राजकीय कुटुंबातच झाला होता.