हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका, पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा, भारताची दहशत स्पष्ट

पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल किती दहशत आहे, हे पाकिस्तानमधील माजी परराष्ट्रमंत्र्यांनीच स्पष्ट केलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने भीतीपोटीच सुटका केल्याचं पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानी संसदेत बोलताना सांगितलं. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.

हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका, पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा, भारताची दहशत स्पष्ट
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 8:29 AM

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर कितीही कुरघोडी करण्यात येत असल्या तर पाकिस्तानच्या मनात भारत आणि मोदी सरकारची किती भीती आहे, हे आता स्पष्ट झालंय. तशी कबुलीच पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनेच सोडलं, असं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ पाकिस्तानी संसदेत बोलताना म्हणाले. (Former Pakistani minister clears India’s terror in Pakistans mind)

26 फेब्रवारी 2019 मध्ये भारतील सैन्याकडून बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करण्यातं आलं. त्यावर पाकिस्तानी लष्कर किंवा तिथले सरकार कायम प्रश्न उपस्थित करत असले तरी त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला खुलासा पाकिस्तानच्या मनातील भारतीय लष्कर आणि मोदी सरकारबद्दलची भीती स्पष्ट करतो. ‘विंग कमांडर अभिनंदन यांना भारताबद्दल असणाऱ्या भीतीपोटी सोडण्यात आलं. पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आल्याचंही ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले.

पाकिस्तानमधील खासदार अयाज सादिक यांनी तर पाकिस्तानी सैन्य प्रमुखांची झालेली हालत बोलून दाखवली. “त्यावेळी पाकिस्तानी सरकारच्या मनात भारत हल्ला तर करणार नाही ना, अशी भीती होती. भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानचे तत्कालीन सेनाप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांना प्रचंड घाम फुटला होता. बाजवा यांना भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची मोठी भीती वाटत होती”, अशा शब्दात अयाज सादिक यांनी पाकिस्तानच्या मनातील त्यावेळची भीती बोलून दाखवली.

पाकिस्तानी सेना प्रमुखांसह परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशीही त्यावेळी थरथर कापत होते, असं अयाज सादिक म्हणाले. “परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी कापत होते. ते विनंती करत होते, की कृपा करुन अभिनंदन यांना सोडा. जर अभिनंदन यांना रात्री ९ वाजेपर्यंत सोडलं नाही तर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल”. (Former Pakistani minister clears India’s terror in Pakistans mind)

संबित पात्रा यांचा राहुल गांधींना सवाल

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासंबंधी एक ट्विट करुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत होता ना? पंतप्रधान मोदी यांची दहशत जरा पाहा. पाकिस्तानमध्ये सरदार अयाज सादिक सांगत आहेत, की पाकिस्तानच्या संसदेत सैन्य प्रमुखाचे पाय कापत होते आणि त्यांना घाम फुटला होता, की भारत हल्ला तर करणार नाही ना! काही समजलं?” असं ट्वीट संबित पात्रा यांनी केलं आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये काय झालं?

फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी फायटर जेट पाठवले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय वायूसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यासाठी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21मधून उड्डाण घेतलं. मात्र, अभिनंदन यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडले. तिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं. यानंतर भारताकडून पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण करण्यात आला. त्यामुळे अखेर पाकिस्तानने माघार घेत अटारी बॉर्डरवर अभिनंदन यांना भारताच्या स्वाधिन केलं.

संबंधित बातम्या:

ढाण्या वाघाची ग्रँड एण्ट्री! विंग कमांडर अभिनंदन पिस्तुलसह मायभूमीत!

वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अजहरला आानंदाच्या उकळ्या, ऑडिओ टेप जारी

आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार!, पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा निर्णय

(Former Pakistani minister clears India’s terror in Pakistans mind)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.