Imran khan : पाकिस्तानात इम्रान खान यांची हत्या झाल्याची अफवा, इस्मालाबाद पोलीस हाय अलर्टवर, इम्रान यांच्या घराची सुरक्षा वाढवली
सत्तेतून बेदखल झालेल्या इम्रानने यापूर्वी अनेकदा आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा केला आहे.
इस्लामाबाद – पाकिस्तानात (Pakisthan) सुरु असलेल्या सत्तासंघर्षात शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांची हत्या झाल्याच्या अपवेने वातावरण तणावपूर्ण झाले. ही बातमी पसरु लागताच इस्लामाबादमधील पोलीस विभाग हाय अलर्टवर काम करु लागला. या अफवेनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही जाहीर सभा घेण्यासही शहरात बंदी घालण्यात आल्याची माहिती आहे. इस्लामाबादमध्ये (Islamabad)असलेले इम्रान खान यांचे अलिशान घर बनी गाला याचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी बनी गाला परिसरात विशेष सुरक्षा तैनात केली असल्याची माहिती इस्लामाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या घराच्या परिसरात कोण कोण आहे, याची माहिती अद्याप पोलिसांनाही माहिती नसल्याचे सांगण्यात येते आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या परिसरात संचारबंदीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
In view of the expected arrival of PTI Chairman Imran Khan in Bani Gala, security around Bani Gala has been strengthened and placed on high alert. However, until now Islamabad Police has not received any confirmed news of return from Imran Khan’s team. 1/3
हे सुद्धा वाचा— Islamabad Police (@ICT_Police) June 4, 2022
इम्रान खान यांना काही झाले तर तो पाकवर हल्ला
इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की, इम्रान खान पूर्ण सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यांच्या टीमकडूनही यात सहकार्य मिळेल अशी आशा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या जीवाला काही झाले तर तो पाकिस्तानवर हल्ला मानण्यात येईल, असे इम्रान यांचे पुतणे हसन नियाजी यांनी म्हटले आहे. याचा कट करणाऱ्यांना असे जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल की त्यांना पश्चाताप होईल असेही हसन नियाजी यांनी सांगितले आहे.
इम्रान आणि त्यांच्या मंत्र्याने व्यक्त केली होती मृत्यूची शंका
इम्रान खान यांच्या कार्यकाळातील मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले होते की इम्रान खान रविवारी इस्लामाबादमध्ये येत आहेत. देशाच्या सुरक्षे यंत्रणेने इम्रान यांच्या हत्येच्या कटाबाबत सांगितल्याचे चौधरी यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते. पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे नेते फैसल वावडा यांनीही याच प्रकाराने दावे केले होते, देशाला विकण्यासाठी नकार दिल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनीही त्यांच्या हत्येच्या कटाची शंका व्यक्त केली होती. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानातील आणि कही बाहेरील व्यक्ती आपल्याला मारु इच्छितात असे ते म्हणाले होते. आपलया जीवाला काही झाल्यास एक व्हिडीओ सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचेही त्यांनी सांगितले होते.
या व्हिडिओतून सर्व नावे जगासमोर येतील असेही इम्रान यांनी सांगितले होते. सत्तेतून पायउरतार झाल्यानंतर त्यांना जीवाला धोका असल्याची जाणीव झाली होती.