“राग समजू शकतो, पण हिंसा सहन केली जाणार नाही”, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा हल्लेखोरांना इशारा
फ्रान्स लोकांची अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याचं समर्थन करतो, ज्यात कार्टुन झापलं जाणं स्वाभाविक आहे. पण त्या कार्टुनचं समर्थन आपलं सरकार करत नसल्याचं मॅक्रॉन यांनी हल्लेखोरांना इशारा देताना स्पष्ट केलं आहे.
पॅरिस: फ्रान्समध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हल्लेखोरांना इशारा दिलाय. फ्रान्समध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा सहन केली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. नीस शहरातील चर्चमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ल्योनमध्ये एका पादरीला गोळी मारण्यात आली आहे. दरम्यान, हा हल्ला कट्टरपंथियांनी केल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Paris: French President Emmanuel Macron warns attackers about freedom of expression)
फ्रान्स कुठल्याही प्रकारे मुस्लिम विरोधी नाही. देशातील वातावरण शांत करण्यासह लोकांच्या अधिकारांचं रक्षण करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं इमॅन्युल मॅक्रॉन म्हणाले.
फ्रान्स लोकांची अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्याचं समर्थन करतो, ज्यात कार्टुन झापलं जाणं स्वाभाविक आहे. पण त्या कार्टुनचं समर्थन आपलं सरकार करत नसल्याचं मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं आहे. फ्रान्स मुस्लिमविरोधी नसल्याचंही मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं आहे. ‘त्या’ कार्टुनला विरोध करणाऱ्या लोकांच्या विचारांचा आपण सन्मान करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर फ्रान्समध्ये लेखन, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करत राहू, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’
नीस शहरातील हत्याकांडानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी देशात सर्वोच्च स्तरावरील सतर्कतेचा (Maximum Alert) सुरक्षा अलर्ट घोषित केला आहे. गुरुवारी (29 ऑक्टोबर) नीस शहरात एका हल्लेखोराने चाकूने हल्ला करत 3 लोकांचा जीव घेतला. या हल्ल्यात इतर काही लोकही जखमी झाले आहेत. नीसमधील चर्चमध्ये हल्ला करणारा आरोपी 21 वर्षांचा असून ट्यूनीशियाचा नागरिक असल्याचं सांगितलं जातंय. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत फ्रान्ससोबत असल्याचं सांगत मॅक्टोन यांना धीर दिला आहे
संबंधित बातम्या:
भेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण काय?
फ्रान्समध्ये चर्चबाहेर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू
Paris French President Emmanuel Macron warns attackers about freedom of expression