मोबाईल चार्जिंगला लावून कानात हेडफोन, मोबाईल स्फोटात तरुणीचा मृत्यू
मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू (Girl death due to mobile blast) झाला आहे. मुलगी झोपलेली असताना तिने फोन चार्जिंगला लावला होता.
नुर-सुलतान (कझाकिस्तान) : मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू (Girl death due to mobile blast) झाला आहे. मुलगी झोपलेली असताना तिने फोन चार्जिंगला लावला होता. यावेळी फोन गरम झाला आणि त्याचा स्फोट (Girl death due to mobile blast) झाला. त्यामुळे मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहे. ही धक्कादायक घटना कझाकिस्तानच्या बास्तोब येथे घडली. अलुआ असेटकिजी असं या मृत झालेल्या मुलीचं नाव आहे.
मुलगी रात्री झोपलेली होती. यावेळी ती मोबाईल चार्जिंगला लावून गाणी ऐकत होती. गाणी ऐकत ती झोपून गेली. पण रात्रभर मोबाईल चार्जिगंला असल्याने तो गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. विशेष म्हणजे हा फोन मुलीच्या उशीजवळ होता. त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला.
तिच्या मृतदेहाचा फॉरेन्सिक तज्ञांकडूही तपास करण्यात आला. त्यामध्येही फोन गरम झाल्याने तिचा मृतदेह झाल्याचे आढळून आले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
“तू आमच्यात नाहीस यावर मला आता विश्वास बसत नाही. आम्ही बेस्ट फ्रेण्ड होतो आणि लहानपणापासून एकत्र होतो. तुझी कमी नेहमी जाणवेल”, असं मुलीचा बेस्ट फ्रेण्ड अयाझान म्हणाला.
चार्जिंग दरम्यान मोबाईल स्फोटच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. स्फोट होण्याचे महत्त्वाचे कारण असे की, फोन गरम होत असल्यामुळे स्फोट होतात. जर तुम्ही दिवसभर तुमचा फोन चार्ज करत असाल, तर हे तातडीने बंद करा. तसेच फोन उशी खाली घेऊन झोपू नका. बरेच लोक फोन चार्जिंगला लावून गेम खेळतात, फोनवर बोलतात. या अशा गोष्टींमुळे फोनमध्ये स्फोट होतात. यासाठी आपण याची काळजी घेणे गरजेचे आहे.