धक्कादायक! स्कूल बसमध्ये श्वास कोंडला आणि… चार वर्षांच्या भारतीय मुलीचा घडली भयंकर घटना

सगळ्या मुलांना उतरवल्यानंतर ड्रायव्हरने बस न चेक करताच शाळेच्या परिसरात पार्क केली. नंतर प्रचंड उष्णतेमुळे आणि श्वास कोंडल्याने या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

धक्कादायक! स्कूल बसमध्ये श्वास कोंडला आणि... चार वर्षांच्या भारतीय मुलीचा घडली भयंकर घटना
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 11:27 PM

दोहा : रविवारी ज्या लहानगीचा वाढदिवस घरात उत्साहात साजरा झाला, त्या लहानगीचे कोडकौतुक करण्यात आले, केक कापण्यात आला, त्याच घरावर दुसऱ्याच दिवशी दु:खांचं सावट पसरलं आहे. कतारमध्ये(Qatar) चार वर्षांच्या लहानगीच्या मृत्यूनं तिचे भारतीय आई-बाप उद्ध्वस्त झाले आहेत. काल जिचा वाढदिवस साजरा केला, त्या चिमुरडीचा मृतदेह घरात आणण्याची वेळ पालकांवर आलीय. अशी वेळ कुठल्याच पालकांवर येऊ नये अशीच ही घटना आहे.

मृत चार वर्षांची चिमुरडी स्कूल बसमधून शाळेत जात होती. बसमध्येच तिला झोप लागली. बसमध्ये असलेल्या इतर विद्यार्थ्यांना आणि बसमधील कर्मचाऱ्यांनाही ती शेवटपर्यंत दिसलीच नाही.

सगळ्या मुलांना उतरवल्यानंतर ड्रायव्हरने बस न चेक करताच शाळेच्या परिसरात पार्क केली. नंतर प्रचंड उष्णतेमुळे आणि श्वास कोंडल्याने या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ज्या मुलीचा मृत्यू झाला आहे ती मूळची केरळची आहे. तिचे वय चार वर्षांचे होते. अल वाकराच्या स्प्रिंगफील्ड किंडरगार्डन शाळेत ती शिकत होती. या लहानगीचे वय मिनसा मरीयम असे आहे.

चार तासांनंतर बस ड्रायव्हर आणि त्याच्या क्लीनरने या मुलीले पाहिले असे स्थानिक वृत्तसंस्थांनी सांगितले आहे. वडील अभिलाष चाको आणि आई सौम्या यांची मिनसा ही दुसरी मुलगी होती.

या मुलीचे भारतातील नातेवाईक हे कोट्टयममध्ये छिगनवानम येथे राहतात. त्यांनी सांगितले की जेव्हा शाळा सुटली, तेव्हा दुपारी ड्रायव्हर आणि क्लीनर मुलांना पुन्हा घरी सोडण्यासाठी बसमध्ये परतले. त्यावेळी त्यांना मिनसा बसमध्ये बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले.

मिनसला त्यानंतर तातडीने वकरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. तिचा जीव वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले असे हॉस्पिटलने सांगितले आहे.

कतार ट्रिब्युनने दिलेल्या माहितीनुसार, कतारमध्ये सध्या 36 ते 43 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. दरम्यान कतारच्या शिक्षण मंत्रालयाने या मुलीच्या निधनाबद्दल ट्विटरवर दु:ख व्यक्त केले आहे.

या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.