आठ वर्ष चालले खोदकाम, मग इतके सोने मिळाले की म्हणावे लागले, “खुल जा सिम सिम”
सोन्याच्या भंडारावरुन देशाची श्रीमंत मोजली जाते. चीनला आता मोठे सोन्याचे भंडार मिळाले आहे. हे भंडार तब्बल आठ वर्ष खोदकाम केल्यानंतर मिळाले आहे. हे भंडार इतके मोठे आहे की तुम्ही एकावर ठेवलेले शून्य मोजता मोजता थकणार आहे.
बीजिंग : कोणत्याही देशाची श्रीमंती त्या देशातील सोन्याच्या भंडारावरुन मोजली जाते. त्यामुळेच कधी काळी भारताला सोने की चिड़िया म्हटले जात होते. परंतु इंग्रजांनी भारतातील सर्व संपत्ती नेली. अन् कधीकाळी समुद्ध असणारा भारत आता विकसनशील देश झाला. भारताशेजारील चीनला सोन्याचे मोठे भंडार मिळाले आहे. हे भंडार इतके मोठे आहे की तुम्ही एकावर ठेवलेले शून्य मोजता मोजता थकणार आहे. चीनमधील खाणींमध्ये आठ वर्षे खोदकाम केल्यानंतर हे सोने मिळाले आहेत. या सोन्याची किंमत 3 Trillion Dollar म्हटली जातेय.
चीनमधील सरकारी माध्यम असलेल्या सीजीटीएनने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार चीनमधील शेडोंग प्रांतात रुशान शहरात “खुल जा सिम सिम” म्हणावे, इतके मोठे भंडार मिळाले आहे. शेडोंग प्रोविंशियल ऑफ जियोलॉजी अँड मिनरल रिसोर्सेजतर्फे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ही सोन्याची खाण एक मोठा क्षेत्रफळात आहे.
या ठिकाणी तब्बल आठ वर्ष खोदकाम सुरु होते. त्यानंतर हा सोन्याचा साठा सापडला. यामुळे आता चीनच्या सोन्याचा भंडारात मोठी वाढ होणार आहे. खाणीत मिळालेले सोने हे उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे त्याला रिफाईन करणेही सोपे होणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये चीनकडे 1,869 टन सोन्याचा साठा होता.
2023 मधील सर्वात मोठी खाण
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आठ वर्षांच्या खोदकामानंतर कोउ गोल्ड माइन (Xilaokou Gold Mine) मिळाले आहे. यामुळे चीनमधील हा भाग सर्वात मोठा सोन्याचा भंडार असणारा ठरला आहे. 2023 मध्ये मिळालेली ही सर्वात मोठी खाण आहे.
सोन्याची किंमत मोजताना थकणार
चीनमध्ये मिळालेल्या या सोन्याची किंमत तब्बल 3 ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजे त्याला भारतीय रुपयात रुपातंर केले तर जवळपास 247 लाख कोटी ही किंमत आहे. म्हणजे एकावर शून्य मोजता मोजता तुम्ही थकणार आहेत. शेडोंग प्रांतीय भूगर्भशास्त्र आणि खनिज संसाधन संस्थेने म्हटले आहे की, हा सोन्याचा साठा मोठ्या भागात पसरलेला आहे. यामुळे, येथून सोने काढणे खूप सोपे आहे. मूल्यमापनानंतर सोन्याचा साठा किमान 20 वर्षे काढता येणार आहे. त्यातून सुमारे 2 हजार टन सुवर्ण धातू मिळणार आहे.
ज्या गोष्टीची किळस वाटते, ती सोन्यापेक्षा महाग, तिची होणारी कोट्यवधींची तस्करी पकडली…वाचा सविस्तर